Preparations for the swearing-in ceremony begin; Vishwajit Rane will get a big ministerial post Sudin Dhavalikar appointed as Cabinet Minister Dainik Gomantak
गोवा

ठरलं ! शपथविधीची तयारी सुरू; राणेंची नाराजी दूर, ढवळीकरांना कॅबिनेट

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळूनसुद्धा लांबलेल्या शपथविधी सोहळ्यामागे पक्षात सारे काही ठिक आहे, अशी स्थिती नाही. काल रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलवून घेतले होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळूनसुद्धा लांबलेल्या शपथविधी सोहळ्यामागे पक्षात सारे काही ठिक आहे, अशी स्थिती नाही. शनिवारी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांना गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलावून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सावंत हे रविवारी पहाटे गोव्यात परतले. विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनीही दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलणी केल्यानंतर ते सायंकाळी उशिरा मुंबईत दाखल झाले.

राणेंना वरचे स्थान, ढवळीकरांना ‘कॅबिनेट’

मुख्यमंत्री सावंत हे दिल्लीतील बैठक संपवून पहाटे गोव्यात आले आणि त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. मात्र, राणे यांनी अजूनही दिल्लीत तळ ठोकला आहे. ते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करीत आहेत. मात्र, राणेंना मंत्रिमंडळात वरचे स्थान मिळणार असल्याचे संकेत आहेत. तसेच मगो पक्षाला सत्तेत सहभागी करून घेण्यावर दिल्लीतील नेत्यांनी अनुकूलता दर्शवली असून सुदिन ढवळीकरांना (Sudin Dhavalikar) ही कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकते.

दिल्लीत झालेल्या बैठकीत नेता निवडीबरोबर मंत्रिपदाविषयी चर्चा झाली असून, मगोप आणि गोवा फॉरवर्ड यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी पक्षाचे वरिष्ठ अनुकूल असले तरी या दोन्हीही पक्षांना मंत्रिमंडळात घेण्याविषयीचा स्थानिक नेत्यांचा विरोध कायम आहे. मात्र, मगोपला (MGP) सोबत घेण्याच्या सूचना केंद्रीय नेत्यांनी केल्या आहेत.

शपथविधीची तयारी सुरू

भाजपने (BJP) ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शपथविधीची तयारी सुरू केली असून हा सोहळा तितकाच दिमाखदार पद्धतीने करण्याचा भाजपचा प्रयत्न असून यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पूर्वनियोजित कामामुळे या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT