156 योजना घरोघरी पोचवण्यासाठीच सरकार तुमच्या दारी  Dainik Gomantak
गोवा

156 योजना घरोघरी पोचवण्यासाठीच सरकार तुमच्या दारी

जे चांगले काम करतात त्यांचे अभिनंदन व्हायला हवे ,सरकारच्या 156 सरकारी योजना प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोचवण्यासाठीच सरकार तुमच्या दारी आले आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: प्रत्येक काम सरकारी अधिकारी करून जनतेला देणार आहे. जे कोणी काम चुकार करणार त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. आज पर्यंत एकूण वीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. जे चांगले काम करतात त्यांचे अभिनंदन व्हायला हवे ,सरकारच्या 156 सरकारी योजना प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोचवण्यासाठीच सरकार तुमच्या दारी आले आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर खास उभारलेल्या मंडपात सरकार तुमच्या दारी या उपक्रमाबद्दल बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, धारगळ जिला सदस्य मनोहर धारगळकर, कोरगाव सरपंच सौ. उमा साळगावकर , जिल्हाधिकारी अजित रॉय आदी उपस्थित होते. स्वागत सूत्रसंचालन प्रा. विठोबा बगळी यांनी केले. नयनी शेटगावकर, दीपा तळकर, प्राजक्ता कान्नायिक, प्रगती सोपटे, शैला नाईक, अमिषा केरकर, तृप्ती सावळ देसाई, विशाखा गडेकर व प्रतीक्षा गावस आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या ठिकाणी खास विविध दालने व स्वयं सहाय गटाचे दालने मांडली होती. एकूण एकूण 35 खात्याचे विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते, त्यात उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर, मामलेदार अनंत मळीक आदी उपस्थित होते, कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी जातीनिशी पोलीस फौज फाट्यासहित उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पुढे बोलताना सरकारी अधिकारी पूर्णपणे काम करून देणार आहे त्यांच्याविषयी आपल्याला विश्वास आहे. प्रत्येक नागरिक ज्यावेळी कार्यलयात उपस्थित राहतो त्यावेळी त्याना का आलात कोणते काम आहे हे विचारण्याची गरज आहे असे सांगितले. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सार्वजण एकत्रित येवूया असे आवाहन केले. सगळ्यांनी जर आपल्याला साथ दिली तर गोवा स्वयंपूर्ण व्हायला विलंब लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला. सरकारि अधिकरी त्या त्या पंचायतीत बसते किती जणांनी त्या अधिकार्याला भेटून आमच्यासाठी कोणत्या योजना आहेत सर्वांनी जबाबदारी घेवून सर्व प्रोब्लेम सोडवूया, वादळात वीज खात्याने कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर अधिकारी यांनी केलेले कार्य आम्हाला विसरता येणार नाही. 40 खात्याचे अधिकारी या उपक्रमात आहेत. स्वयंपूर्ण गोवा करताना एकही मूळ गोयकार सरकारी योजनेपासून वंचित राहणार नाही यांची जबादारी जशी लोकप्रतिनिधीची आहे त्याच पद्धतीने प्रत्येक नागरिकांची आहे.

कोविडने डोळे उघडले

आमचे सर्वांचे डोळे हे कोविडने उघडले आहे आम्हाला जी आवश्यक फळे फुले भाजी लागते ती आम्ही बाहेरुन वाट पाहत होतो, ती आम्ही या राज्यात पिकवण्याची क्षमता शेतकऱ्यांची आहे. आता आम्ही फळा भाजी फुलासाठी बाहेरच्या राज्याकडे अवलंबून राहणार आहोत का , जर बाहेरून झेडूंची फुले आली नाही तर आम्ही दसरा दिवाळी साजरी करणार नाहीत का असा सवाल मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी उपस्थित करून हे उत्पन्न या भूमीत घेवून स्वयंपूर्ण गोवा बनवूया असे आवाहन केले.

100 टक्के लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी

सरकार तुमच्यादारी या उपक्रमाद्वारे जे जे जे अधिकारी या ठिकाणी आले ते 100 टक्के लोकांची कामे करण्यासाठी आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

विविध मदतीचे धनादेश वितरीत.

यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी कोविड मुळे मरण पावलेल्या नातेवाईकाना इनासियो दुराते, भाग्यश्री पालयेकर, लक्ष्मि सावंत, विनात राऊळ, सुचिता सावंत, प्रणोती नाईक, दीपिका महाले, इंदिराबाई जोशी, संजय शेटमांद्रेकर, मनोहर पोखरे, चंपावती धारगळकर , ज्ञानेश्वर शिवजी, अजय पोल्जी, श्वेता खड्जी, सेजल कशाळकर, शिवाय रिक्षा पायलट स्वप्नील मांजी, विश्वनाथ सांगळे, अह्मिद धर्वाज्कार, गजानन गवंडी, हनुमंत राव आदींनी मदत देण्यात आली.उपमुख्यमंत्री कडाडले

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे यावेळी जणू आपण विरोधी नेता आहे अश्या पद्धतीने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत तावातावाने बोलत होते, ते बोलत असतातच भाजपचे जेष्ठ कार्यकर्त्ये दाजी कासकर यांनी उठून हो कॉंग्रेसचा आमदार आहे कि मंत्री असा सवाल उपस्थित केला असता बाबू ने त्याना तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा , भूमिपुत्र उमेदवार हवा ते तिथे सांगा इथे आपण लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्याकडे प्रश्न मांडतो. पाणी, रस्त्ये वीज या गंभीर समस्या असल्याचे आजगावकर म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग बनवला तो खड्डेमय त्या खड्ड्यातून वाहने चालवून आपली मांन मोडली, खूप त्रास होतो, जिथे सर्विस रस्ते आहे तिथे ते बनवले नाही, कंत्राटदार मनमानी करत आहे त्याला काबूत आणण्याचे आवाहन केले. पाणी समस्या गंभीर आहे जर पाणी उपलब्ध आहे तर ते सोडत का नाही, आपण व्होळ बदलायचा का असा सवाल उपस्थित करून अश्या कामचुकार अधिकाऱ्यांना वेठीस धरा असे आवाहन केले. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे बहुजन समाजाचे सुपर डोक्याचे आहे. कोरोना काळात केलेले कार्य कुणीही विसरू शकत नाही असे सांगितले. सरकारला पुन्हा एकदा जनतेने साथ द्यावी असे आवाहन केले.

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांमी बोलताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नैतृत्वाखाली सरकार राज्याची प्रगती करत आहे. अनेक अधिकारी चांगले काम करतात तर काही अधिकारी आपल्याच मतदार संघातील काही पंचायतीमध्ये स्वयं मित्र काम करत नसल्याची तक्रार करत आता त्यांची नावे सांगणार नाही, मात्र मुख्यमंत्र्याच्या कानावर आपण घालणार आहे. विरोध पक्षाकडे काहीच कार्यक्रम नाही. आमदाराचे काम जे जे सरकारच्या योजना आहे ते काम आमदार लोकापर्यत पोचवतो, त्यात अधिकारीही सहभागी असतात. शेवटी सुदेश सावंत यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी पेडणे तालुक्यातील सर्व सरपंच आणि स्वयंमित्र यांच्याकडून कार्याची पाहणी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT