Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

CM प्रमोद सावंत यांनी गोव्याची वाट लावली, राज्याला 'ड्रग कॅपिटल' केले; खासदार विरियातो बरसले

South Goa MP Viriato Fernandes: हणजुणे भागातील ध्वनी प्रदूषण उल्लंघनाविरोधात आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी विरियातो यांनी दिला.

Pramod Yadav

हणजुणे: येथे उशीरा रात्रीपर्यंत सुरु असणाऱ्या संगीत पार्ट्याविरोधात संतप्त नागरिकांना आंदोलन केले. यात काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांना भाग घेतला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याची वाट लावलीय, त्यांनी राज्याला गुन्हे तसेच ड्रग कॅपिटल केल्याची टीका खासदार विरियातोंनी केली.

हणजुणे परिसरात रात्री दाहा नंतर सुरु असणाऱ्या संगीत पार्ट्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात स्थानिक रस्त्यावर उतरले. न्यायालयाने आदेश देऊन देखील राज्यात कायद्याला न जुमानता रात्री उशीरापर्यंत संगीत पार्ट्या सुरु आहेत.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचा आरोप यावेळी खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला. गोव्याच्या विनाशासाठी आणि अनाआरोग्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार आहेत. राज्यातील ड्रग कल्चर देखील त्यांच्यामुळेच असल्याचे विरियातो म्हणाले.

हणजुणे भागातील ध्वनी प्रदूषण उल्लंघनाविरोधात आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी विरियातो यांनी दिला.

उत्तर गोव्याचे खासदारांवर मी काही बोलणार नाही, असे विरियातो म्हणाले. आवाज बंद झालेल्या नेत्याला जर संसदेत पाठवले तर असेच होईल, याचे जाण उत्तर गोव्यातील लोकांना व्हायला हवी.

येत्या १९ डिसेंबरला मुख्यमंत्री सावंतांना राज्याचे ड्रग, मर्डर आणि रेप कॅपिटल केल्याप्रकरणी त्यांना टायटल देऊया, असेही विरियातो म्हणाले.

दरम्यान, हणजुणे पोलिसांनी थलासा रेस्टॉरंट विरोधात रात्री दहानंतर देखील मोठ्या आवाजात संगीत सुरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला.

रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत सुरु वाजवणाऱ्या रेस्टॉरंट क्लब विरोधात करावाई करण्याची मागणी स्थानिक करत असून, हे आंदोलन तीव्र झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT