CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Operation Sindoor: ‘सिंदूर मिटाने वालों को ही मिटा दिया’! शिरोडा येथील भाजप मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

CM Pramod Sawant: भ्याड हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही, असे म्हणून सार्थ कृती केलेल्या पंतप्रधानांना जगभरातून पाठिंबा मिळत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

Sameer Panditrao

शिरोडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून दहशतवाद्यांच्या विरोधात आहे, म्हणूनच देश प्रथमचा वसा घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सिंदूर मिटाने वालों को ही मिटादिया’, या तत्त्वानुसार दहशतवाद्यांचे तळच उद्ध्वस्त केले.

आपल्या देशावर भ्याड हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही, असे म्हणून सार्थ कृती केलेल्या पंतप्रधानांना जगभरातून पाठिंबा मिळत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, देश पुढे जाण्यासाठी आज भाजपची गरज आहे.

जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अंत्योदय तत्त्वावर काम करायला हवे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिकवले. मागच्या पन्नास वर्षांत जी कामे झाली नाही ती मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यापासून सुरू आहेत. विकासाची ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार असून प्रत्येकाने भाजपला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, प्रत्येकाने आपण भाजपचे घटक आहोत, हे मनात ठाम बिंबवले पाहिजे. आज देशात चौदा कोटी भाजपचे सदस्य झालेले आहेत. प्रत्येकाने राज्यात कमळ फुलवून पक्षवाढीसाठी काम करावे. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वांत मोठा पक्ष असून अंत्योदय तत्त्वावर काम करून नागरिकांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

यावेळी दामू नाईक यांच्या हस्ते शिरोडा भाजपच्या नूतन समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नरेंद्र सावईकर, सदानंद शेट तानावडे यांची भाषणे झाली. समई प्रज्वलनाने मेळाव्याला प्रारंभ झाला.

सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांचा पुष्पहार घालून सत्कार केला. अक्षय गावकर यांनी स्वागत केले. सरपंच पल्लवी शिरोडकर, नारायण कामत, मधू खांडेपारकर, जयेश नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अवधुत नाईक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गौरी शिरोडकर यांनी आभार मानले.

२०४७ पर्यंत गोमंतकीयांना विपुल पाणी

सुभाष शिरोडकर म्हणाले की, २०४७ पर्यंत सर्व गोमंतकीयांना विपुल प्रमाणात पाणी पुरवठा करण्याची योजना आखलेली आहे. सहकार क्षेत्र समृद्ध करून त्याचा फायदा गरीब जनतेला करून कमी व्याजाने पैसे देऊन धंदे व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रात गोवा प्रथम क्रमांकावर असून देशात सात कोटी युवकांची ताकद आहे. इतर देशांकडे ती नाही. शिरोडा मतदारसंघात दोन वैद्यकीय महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आहे, त्यामुळे शिरोडा मतदारसंघ सर्वांत पुढे आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT