Goa Assembly Session 2024| Speaker Ramesh Tawadkar
Goa Assembly Session 2024| Speaker Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: प्रकाश वेळीप यांना समन्स

दैनिक गोमन्तक

Goa Politics: विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आणि कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यातील वादाला वेगळेच वळण लागले आहे. या वादानंतर तवडकर यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप कऱणारे ‘उटा’ या आदिवासी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्याविरोधात तवडकर यांनी हक्कभंगाची कारवाई सुरू केली आहे.

त्यांना उद्या (शनिवारी) दुपारी 3.30 वाजता सभापतींसमोर उपस्थित राहावे, असे समन्स बजावण्यात आले आहे. माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्यावर सभापती रमेश तवडकर यांनी हक्कभंगाची कारवाई सुरू केली आहे.

वेळीप त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांबाबत त्यांना विधानसभेत बोलावून जाब विचारण्यात येईल, अशी माहिती सभापतींनी आज दिली. विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभापतींनी, ‘मला काही निवेदन करायचे आहे’, असे नमूद केले. ते म्हणाले की, माजी आमदार तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत.

सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे. असे असतानाही त्यांनी केलेल्या आरोपांमुळे विशेषाधिकाराचा भंग व सभापतिपदाचा अवमान झाला आहे. त्यामुळे त्यांना येथे बोलावून जाब विचारण्यात येईल.

वेळीप यांनी ‘युनायटेड ट्रायबल अलायन्स’ म्हणजे ‘उटा’ या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने गुरुवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन तवडकर यांच्यावर आरोप केले होते. तवडकर यांनीही पत्रकार परिषद घेत त्याला प्रत्युत्तर दिले होते.

माध्यमांना तंबी : सभापतींनी यावेळी प्रसारमाध्यमांना अशी तंबी दिली. ते म्हणाले की, प्रसार माध्यमांवर कोणत्याही गोष्टींचा प्रसार करण्यावर बंधन नाही. आरोप प्रसिद्ध करण्याआधी शहानिशा करणे गरजेचे आहे. विधानसभा अधिवेशन काळात विशेषाधिकारांचा भंग आणि अवमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

अद्याप काही ठरवलेले नाही : वेळीप

विधिमंडळ सचिवालयाने खास कर्मचारी पाठवून वेळीप यांच्या निवासस्थानी समन्‍स बजावलेे. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता वेळीप यांना समन्स मिळाले. त्यापूर्वी ई-मेलवरही वेळीप यांना समन्स पाठवले होते. वेळीप यांनी या प्रकरणावर आज बोलण्‍यास नकार दिला. उद्या दुपारी सभापतींसमोर उपस्थित राहणार की नाही, याबाबत काही ठरवलेले नाही, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण मिटवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यामुळे खीळ बसली आहे.

लोकशाहीमध्ये घटनात्मक पदावरील व्यक्तीनेच पत्रकारांना धमकावणे अत्यंत दुर्दैवी आहे. जे इतरांना शिस्तीचा उपदेश देतात, त्यांनी विश्वासघातकी आणि पक्षांतर करणाऱ्यांविरुद्धच्या याचिकांवर निर्णय देण्याचे कर्तव्य पार पाडताना त्याच शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.
- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT