गोवा

Goa:राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या संचालकपदी प्रदीप शेट, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच मडकई मतदार संघाचे भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप शेट (Pradip Shet) यांची राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी प्रदीप शेट यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा मडकई मतदारसंघाचे भाजप मंडळ अध्यक्ष यांची नुकतीच केंद्रात नवी दिल्ली झालेल्या बैठकीत, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदीप शेट हे निस्सीम कार्यकर्ते असून शैक्षणिक क्षेत्रात म्हणा, सहकार क्षेत्रात तसेच इतर सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीत कामगिरी केली आहे. तसेच अनेक उच्चपद भूषवले आहे. दरम्यान त्यांनी अनेक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, प्रदीप शेट यांची केंद्रात राष्ट्रीय मत्स्यविकास मंडळाच्या झालेल्या बैठकीत मंडळात त्यांची संचालकपदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्या राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री शेट यांचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी अभिनंदन केले.

यावेळी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गिरीश उसकैकर, गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, गोवा क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष गजानन व युवा मोर्चाचे प्रथमेश शेट उपस्थित होते. तसेच श्री शेट यांचे भाजपा गोवा अध्यक्ष सदानंद शेटतानावडे, केशव प्रभू, गोवा महिला संसाधन विकास सहकारी, गोवा प्रदेश ओबीसी अध्यक्ष गौरेश मांद्रेकर यांनी पणजी येथे भाजप मुख्यालयात अभिनंदन केले व त्यांना गोवा भाजपच्या वतीने भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT