Bardez Power Shut Down: Dainik Gomantak
गोवा

Bardez Power Shut Down: बार्देश तालुक्यात 11 ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा राहणार बंद

दुरूस्तीकाम, झाडे तोडणार असल्याने वीज पुरवठा होणार खंडीत

Akshay Nirmale

Bardez Power Shut Down: उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातील काही भागातील वीज पुरवठा बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी खंडीत होणार आहे. 11 KV इंडस्ट्री ओव्हर हेड फीडर आणि हणजुणे येथील 11 KV फीडर येथील दुरूस्तीकामासाठी हा वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

या तातडीच्या दुरूस्तीकामासह काही भागातील झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे हा वीजरपुरवठा खंडीत राहणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे.

या काळात गोटनेचो वाल, गणेश नगर, जलस्त्रोत विभाग, सांकवाळ मध्यवर्ती कारागृह आणि आसपासचा भाग तसेच झोरवाड्डो आणि आसपासच्या भागातील वीज पुरवठा खंडीत राहिल. त्यामुळे या भागातील सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, तातडीच्या दुरूस्ती कामासाठी तालुक्यातील वीज प्रवाह आज, 09 ऑक्टोबर रोजी देखील खंडीत करण्यात आला होता.

सकाळी 9 ते दुपारी 2 या काळात हा वीजपुरवठा खंडित होता. आग्नेल कॉलेज ऑफ इन्स्टिट्युट, गोंघेरो वाडो, सौथा वाडो, खुरसा वाडो, भोवता वाडो, सोकोल वाडो, कुमार वाड्डो, गाववाडी, ग्रँड चिवर, तेमर वाड्डो, हणजुणे व्हिलेज पंचायत इंग्रोज वाड्डो, गुमाल वाड्डो, माझाल वाड्डो, ओणाचे भाट आणि आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT