Govind Gaude: पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागेची पाहणी; फातोर्डा स्टेडियमजवळ दोन जागा निश्चित्त...

उद्घाटन सोहळा असणार अनोखा
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Govind Gaude: गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उद्घाटन समारंभ होणार आहे.

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरद्वारे फातोर्डा स्टेडियमजवळ पोहचणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी आज, सोमवारी क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी फातोर्डा स्टेडियमजवळील दोन जागांची पाहणी केली.

Govind Gaude
Mahadayi Water Dispute: कळसा प्रकल्पासाठी वनजमीन मंजूर; 1 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्नाटककडून निविदा

या दोन जागांची निवड करण्यात आली असून त्यापैकी एक जागा निश्चित्त केली जाईल. तिथे हेलिपॅड बांधले जाणार आहे. जेणेकडून पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर तिथे लँड करता येईल. या दोन्ही जागा फातोर्डा स्टेडियमपासून जवळ आहेत.

गावडे म्हणाले की, 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या काळात गोव्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहे. त्याची जय्यत तरायी सुरू आहे. स्टेडियम, रेस्ट रूम्स अशी सर्व तयारी काही दिवसांत पूर्ण होईल. 28 ठिकाणी स्पर्धा होणार आहे.

फायनल टच देण्याचे काम सुरू आहे. उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार आहेत. वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. उद्घाटन सोहळा वेगळ्या प्रकारे करण्याती तयारी सुरू आहे.

दरम्यान, क्रीडा स्पर्धेची सर्व तयारी 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करू, असे काही दिवासांपुर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com