Electricity Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Power Outage : वीज खंडितचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले;वीजमंत्री ढवळीकरांचा दावा

Power Minister Sudin Dhavalikar : कुठ्ठाळी मतदारसंघात ६ महिन्यांत ११७ खंडित विजेचे प्रकार घटून ते ४० वर आल्याचे त्यांनी नमूद केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येत असल्याने वीज खंडित होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे, असा दावा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज विधानसभेत केला. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हा दावा केला.

कुठ्ठाळी मतदारसंघात ६ महिन्यांत ११७ खंडित विजेचे प्रकार घटून ते ४० वर आल्याचे त्यांनी नमूद केले.

वाझ म्हणाले, भूमिगत वीजवाहिन्या घालण्याची गरज आहे. कुठ्ठाळी मतदारसंघात हे काम कधी पूर्ण करणार ते सांगावे. वायरमन एकच असून तीन साहाय्यक आहेत. वायरमनची संख्या वाढवावी. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी भूमिगत वीजवाहिन्या घातल्यानंतर प्रश्न सुटेल यात शंका नाही, असे नमूद केले. ते म्हणाले, सध्या कोणताही बिघाड झाला की पूर्ण वीजपुरवठा बंद होतो. त्यावर काही उपाययोजना आहे का?

कुठ्ठाळी मतदारसंघात ५१ कोटींची कामे

ढवळीकर म्हणाले, कुडतरीत सहा महिन्यांत भूमिगत वीजवाहिन्या घालणार आहोत. त्या घातल्यानंतर वीज खंडित होण्याचे प्रमाण घटेल. एका दोषामुळे पूर्ण वीजपुरवठा नंतर बंद पडणार नाही. सध्या वीजतारा असल्याने त्यातून मार्ग काढणे कठीण आहे.

कुठ्ठाळी मतदारसंघात ५१ कोटी रुपयांची कामे वीज खात्याने केली आहेत. कुठ्ठाळी ते सांकवाळमार्गे कासावली अशा वीजवाहिन्या घालण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे काम आताच हाती घेणार आहोत.

कमी दाबाच्या वीजवाहिन्या बदलून त्या भूमिगत घालण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. टप्‍प्याटप्प्याने ही कामे हाती घेण्यात येतील. वायरमन नेमण्यासाठी राज्य कर्मचारी भरती आयोगाकडे प्रस्ताव सादर केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT