Assagao Land: अनेक बिगर गोमंतकीयांनी आपले सेकंड होम म्हणून आसगावला पसंती दिली आहे
Goa Land CaseDainik Gomantak

Goa Assagao: आसगावातील जमिनीला सोन्याचा भाव, २५०० विक्री-करार, हाय प्रोफाईल व्यक्तींची मालमत्ता

Assagao Land: अनेक बिगर गोमंतकीयांनी आपले सेकंड होम म्हणून आसगावला पसंती दिली आहे
Published on

म्हापसा: आगरवाडेकर कुटूंबियांचे घर पाडल्यामुळे बार्देश तालुक्यातील आसगाव चर्चेत आले आहे. दुसरीकडे, मागील चार वर्षांत या भागात जमीन व्यवहार संबंधी २५०० विक्री-करार झाले, ज्यात सुमारे ५० टक्के हे बिगर गोमंतकीय आहेत. यामध्ये केवळ व्यापारीच नव्हे, तर बॉलिवूड सेलिब्रेटी, राजकारणी तसेच माजी संरक्षण अधिकारी अशा हाय प्रोफाईल व्यक्तींची आसगावमध्ये मालमत्ता आहे.

आसगाव हा निसर्ग संपन्न तसेच किनारपट्टी लाभलेला गाव आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक बिगर गोमंतकीयांनी आपले सेकंड होम म्हणून आसगावला पसंती दिली आहे. एकेकाळी निर्मनुष्य असलेल्या आसगावाकडे सध्या परदेशी नागरिक व अनिवासी भारतीयांनीचाही डोळा आहे.

ते आता मोठ्या प्रमाणात जमीन व प्राचीन घरांचे मालक बनले आहेत. वाढत्या हाय-प्रोफाइल खरेदीदारांमुळे इथली २०० चौरस मीटरपेक्षा लहान जमिनीची किंमती आता १ कोटींहून अधिक आहे.

जूनमध्ये अनेक मालमत्तांची खरेदी झाली होती. ज्यात बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने १.१८ कोटी रुपये खर्चून ८३३.६२ चौरस मीटर मालमत्ता खरेदी केली. आसगावात २०२० पासून तब्बल २,४७५ विक्री करारांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीही १२.५० कोटी आणि ७.५० कोटी रुपयांच्या खरेदी केलेल्या दोन मालमत्तांची नोंदणी अनुक्रमे मे २०२४ आणि डिसेंबर २०२३ मध्ये झाली.

Assagao Land: अनेक बिगर गोमंतकीयांनी आपले सेकंड होम म्हणून आसगावला पसंती दिली आहे
Assagao Demolition: पूजा शर्माच्या फौजदारी रिव्हिजन अर्जाची सुनावणी तहकूब

परदेशी नागरिकांचाही समावेश

परदेशी नागरिकांमध्ये ३९ कॅनडियन, ४२ ब्रिटिश, ४५ अमेरिकन, १६ सिंगापूर, ६ न्यूझीलंड आणि ४ फ्रेंच नागरिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, १,३०५ विक्रेते आणि ९२१ खरेदीदार आहेत, ज्यात दिल्लीतील २८१, हरियाणातील ९४ आणि उत्तर प्रदेशातील ४२ जणांचा समावेश आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com