Sattari  Dainik Gomantak
गोवा

Sattari Rain : वीजपुरवठा खंडित, लोकांचे हाल; सत्तरीसह अनेक भागात पडझड

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Rain :

वाळपई, एका बाजूने वाढणारे तापमान व दुसऱ्या बाजूला वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वाळपईबरोबर सत्तरीतील बहुतेक ग्रामीण भागात वीज समस्या जाणवत आहे.

मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड होऊन वीज खंडित होणे हा प्रकार घडल्यास समजू शकतात. मात्र, पावसाला जोर येण्यापूर्वीच वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक संतापले आहेत. त्यामुळे वीज खाते करते तरी काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

यासंबंधी सविस्तर माहिती अशी, वाळपई व पर्ये मतदारसंघात मे महिन्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ झालेली आहे. संपूर्ण मे महिना विजेच्या लपंडावात गेला. विजेच्या उपकरणांची दुरुस्ती किंवा नवीन वीजजोडणीची कामे सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित केला जायचा असा नागरिकांचा समज होता. मात्र, आता जून महिना सुरू होऊनही वीजपुरवठा खंडित होणे तसेच सातत्याने वीज खंडित होत असल्याने अनेकांच्या घरातील वीजेवरील उपकरणे निकामी झाली आहेत.

सध्या पावसाला सुरवात झाली असून दुपारच्या वेळी रात्रीच्या वेळी वीज खंडित असल्याने पंखा असूनही शोभेची वस्तू बनली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. अनेक वेळा वीज खात्यात फोन करून तक्रारी दिल्या जातात. मात्र, परत तोच प्रकार घडतो. सत्तरीत यावर कायमचा उपाय म्हणून भूमीगत वीजवाहिनी तसेच इन्सुलेटर वीजवाहिनी घातलेली आहे. मात्र, अजूनही विजेची समस्या सुटलेली नाही.

आता शाळा, काॅलेजलाही सुरवात झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. वाळपई नगरपालिका, ठाणे, नगरगाव, म्हाऊस, त्याचबरोबर इतर पंचायतींतही विजेची समस्या वाढलेली आहे. त्यामुळे वीज खात्याने या समस्यांकडे सोडवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

लाईन कंडक्टर तुटल्याने काळोख

आमोणा सबस्टेशन यार्डमध्ये ३३ केव्ही वाळपई लाईन कंडक्टर तुटण्याची घटना घडली. त्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी तातडीने २ तासांसाठी वाळपई सबस्टेशनचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे सत्तरीतील बहुतेक भागात काळोखाचे साम्राज्य होते. सायंकाळी ६च्या दरम्यान गेलेला वीजपुरवठा रात्री ९ वा.च्या दरम्यान सुरळीत करण्यात आला. दरम्यान, तातडीने दुरुस्तीकाम केले जात असल्याचे वाळपईचे साहाय्यक वीज अभियंता संतोष गावस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT