कॅश नाही वाईन शॉपमध्ये दंडाची रक्कम G-Pay करा; कोलवा पोलिसांचा दंड वसुलीचा अजब प्रकार

घटनास्थळी कार्यरत असलेल्या होमगार्डने दुचाकीची चावी काढली आणि चलनाची रक्कम न भरल्यास त्याला पोलीस ठाण्यात बसावे लागेल अशी धमकी दिली.
Goa Traffic Violation
Goa Traffic ViolationDainik Gomantak
Published on
Updated on

Colva Traffic Police: कोलवा येथे वाहतूक पोलिसांनी अजब पद्धतीने केलेल्या दंड वसुलीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. कारवाई केलेल्या वाहन चालकाकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने त्याला, पैसे चक्क जवळच्या वाईन शॉपमध्ये G-Pay करण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर त्याला दंडाची पावती देखील देण्यात आली नाही अशी माहिती समोर आली आहे.

शनिवारी (दि. 08) कोलवा येथे एका दुचाकी चालकासोबत ही घटना घडली. प्रदुषण प्रमाणपत्र (PUC) नसल्याने त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

नेमकं घडलं काय?

कोलवा येथे एका दुचाकीचालकाला थांबविण्यात आले. त्याच्याकडे प्रदुषण प्रमाणपत्र (PUC) नसल्याने त्याला 5,000 दंड सांगण्यात आला. घटनास्थळी कार्यरत असलेल्या होमगार्डने दुचाकीची चावी काढली आणि चलनाची रक्कम न भरल्यास त्याला पोलीस ठाण्यात बसावे लागेल अशी धमकी दिली.

दरम्यान, दुचाकी चालकाने पैसे नाहीत गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगितले. सर्व ठरल्यानंतर चालकाला जवळच्या वाईन शॉपमध्ये 1000 रूपये देण्यास सांगितले. PUC नसल्याने त्याला हा दंड ठोठावण्यात आला.

Goa Traffic Violation
गोवा, आग्रा आणि बिहारमध्ये झाले धर्मांतर; उत्तर भारतातील उच्चशिक्षित टोळीच्या शोधात पोलीस

धक्कादायक बाब म्हणजे दुचाकी चालकाने भरलेल्या दंडाची पावती देखील त्याला देण्यात आली नाही. चालकाच्या वडिलांनी याप्रकरणी संबधित वाईन शॉप मालकाशी संपर्क करून दिलेल्या पैशांची चौकशी केली असता, पोलिसांनी ते परत घेतल्याचे त्यांना समजले.

दुचाकी चालकाच्या वडिलांनी हे प्रकरण गोवा पोलीस महासंचालक यांच्या कानावर घालून, त्याच्याकडून योग्य कारवाईची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com