Potholes on Panjim Road Dainik Gomantak
गोवा

पणजीत रस्त्यांवरील खडीचा दुचाकीस्वारांना त्रास

पणजीतील रस्त्यांचे डांबरीकरण वादात सापडले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजीतील रस्त्यांचे डांबरीकरण वादात सापडले आहे. ज्या-ज्या रस्त्यांचे डांबरीकरण पावसात धुपून गेले आहे, ते सर्व काम पुन्हा त्याच कंत्राटदाराकडून मोफत करून घेतले जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले आहे. मात्र खराब रस्त्यावरील खडी झाडून बाजूला केली तरी पुन्हा आहे तीच स्थिती निर्माण होत आहे. शिवाय डांबरापासून मोकळी झालेली बारीक खडी दुचाकीस्वारांसाठी धोक्याची ठरू लागली असल्याचे नाराजी व्यक्त केली जात आहे.

राजधानीत अगदी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील रस्त्याचे केलेले डांबरीकरण पावसात खराब होऊन गेले आहे. त्यामुळे आमदार बाबूश मोन्सेरात वैतागलेले होते. शिवाय या रस्त्याचा विषयही महापालिकेच्या बैठकीत उपस्थित झाला होता. त्यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध पोलिस तक्रार करावी, त्याशिवाय दक्षता आयोगाकडेही तक्रार द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे साबांखाने केल्याने त्या कंत्राटदाराविरुद्धची कारवाई साबांखा करणार आहे.

साबांखा मंत्र्यांनी रस्त्याचे काम त्याच कंत्राटदाराकडून मोफत करून घेतले जाईल, असे सांगितलेले आहे. असे असले तरी खराब झालेल्या रस्त्यावरील खडी सध्या अधूनमधून झाडली जात आहे. त्यामुळे खडी झाडून काढली तरी पुन्हा त्या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर पुन्हा डांबरावेगळी खडी होत आहे. त्यामुळे ही खडी चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकीस्वारांना धोक्याची ठरत आहे. या पसरलेल्या खडीवरून एकतर मोठी वाहने गेल्यानंतर धुराळा उडतो, पूर्णपणे रस्ता खरडून ती खडी बाजूला करणे अपेक्षित आहे, पण ते काम केले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT