Potholes in Morjim Dainik Gomantak
गोवा

...अखेर मोरजीतील धोकादायक खड्डे बुजवले

किनारी भागातील रस्त्यांची डागडुजी झाल्याने नागरिकांतून समाधान

दैनिक गोमन्तक

मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील मर्डीवाडा आणि गावडेवाडा येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. ते बुजवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय इतर ठिकाणी जे खड्डे पडले आहेत, तेही त्वरित बुजवावेत अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

या रस्त्याविषयी प्रसिद्धी माध्यमांतून आवाज उठवल्यानंतर माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच दिवसापासून धो-धो पाऊस पडू लागल्याने त्या खड्ड्यात घातलेले सिमेंट वाहून गेले आणि पुन्हा खड्डा मोठा बनला. 17 जुलै रोजी रात्री या खड्ड्यामुळे चारजण जखमी झाले. याचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने 19 रोजी हे खड्डे बुजवण्यासाठी काम सुरू केले. त्याबद्दल स्थानिक नागरिक सोनू शेटगावकर यांनी समाधान व्यक्त केले. मांद्रे मतदारसंघातील इतर रस्त्यांवर जे लहान-मोठे खड्डे पडले आहेत, तेही त्वरित बुजवावेत अशी मागणी सोनू शेटगावकर यांनी केली आहे.

दरम्यान दाभोळकरवाड ते गावडेवाडा किनारी भागापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली होती. त्याही रस्त्याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने 19 रोजी याची दखल घेऊन या खड्ड्यांमध्ये दगड घालून तेही बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

...तर दुर्घटना टाळता आली असती

मर्डीवाडा येथील कोको आर्ट गॅलरीसमोरील मुख्य रस्त्यावर मे महिन्यात एक छोटा खड्डा पडला होता. तो खड्डा वेळीच न बुजवल्याने हळूहळू हा खड्डा दोन मीटरपेक्षा जास्त मोठा झाला. परिणामी, वाहनचालकांचा अंदाज न आल्यामुळे किमान बारा लोक या खड्ड्यामुळे जखमी झाले. अनेक अपघात घडत असतानाच वेळोवेळी हा खड्डा बुजवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT