Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

3.50 लाख रुपये देऊन गोव्यात मिळवली पोस्टमनची नोकरी; 40 गोमंतकीयांना कमी करुन 50 महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती - सरदेसाई

Goa Assembly Monsoon Session 2025: महाराष्ट्रातील उमेदवारांना कोकणी कळत नसल्याने ते पत्र मूळ पत्तावर न पाठवता घरी घेऊन जातात आणि मूळ व्यक्तीपर्यंत ते पोहोचतच नाही; सरदेसाईंचा आरोप

Pramod Yadav

पर्वरी: गोव्यातील १५ ते २० वर्ष अनुभव असलेल्या पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना कमी करुन गोव्यात महाराष्ट्रातील ५० उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. यातील एका उमेदवाराने साडे तीन लाख रुपये भरुन नोकरी मिळवली असल्याचा दावा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंनी केला. कोकणी कळत नसल्याने कर्मचारी मूळ पत्तावर पोहचू शकत नसल्याचे देखील सरदेसाई म्हणाले.

विजय सरदेसाई यांनी शून्य काळात याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र आणि गोवा एकच सर्कल येत असल्याने गोव्यात ५० महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी भरती करण्यात आली आहे. त्यासाठी १५ ते २० वर्षे अनुभव असलेल्या गोव्यातील ४० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले.

महाराष्ट्रातील उमेदवारांना कोकणी कळत नसल्याने ते पत्र मूळ पत्तावर न पाठवता घरी घेऊन जातात आणि मूळ व्यक्तीपर्यंत ते पोहोचतच नाही. याबाबत स्टिंग ऑपरेशन देखील केल्याचा दावा सरदेसाईंनी केला.

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ असल्याचे विजय सरदेसाई म्हणाले. एका उमेदवारांने या नोकरीसाठी ३.५० लाख रुपये दिल्याचा दावा सरदेसाईंनी केला.

महाराष्ट्रातील पोस्टमन गोव्यात नियुक्त झाल्याचे मी मान्य करतो असे उत्तर देताना प्रमोद सावंत म्हणाले. महाराष्ट्र आणि गोवा सर्कल एकच असून, दहावीचे मार्क विचारात घेऊन त्यांची नियुक्ती केली जाते. १५ ते २० वर्षे पूर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही जणांनी केले काहींनी केले नाही. दरम्यान, दहावीचे मार्क विचारात त्यांची निवड झाली नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

गेल्या सहा महिन्यांपासून मी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. कोकणी येते त्यांनाच गोव्यात पोस्टमनची नोकरी द्यावी, अशी केंद्राकडे विनंती करणार असल्याचे सावंत म्हणाले. तसेच, ज्या ४० गोमंतकीयांचा रोजगार गेला आहे त्यांच्यासाठी देखील काही करता येईल का हे तपासले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मोबाईल सोडा, कोलवाळ तुरुंगात टाटा स्कायही सापडला!

Dhirio Goa: बंदी असूनही सोशल मीडियावर 'धीरयो'ची खुलेआम जाहिरात! उच्च न्यायालयाकडून दखल; कारवाईचे निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; डिचोलीत भाजपला हुकमी एक्का

Anjuna Theft: गोव्यात सुपर मार्केटमध्ये केली चोरी, थेट सापडला नेपाळ बॉर्डरवर; संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Rain: गोवेकर काळजी घ्या! जोरदार पाऊस, उंच लाटांची शक्यता; राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT