Mhadai River Dispute: म्हादईचं पाणी पेटलं! विधानसभेत गदारोळ, विरोधकांचा सभापतींच्या हौदात प्रवेश; सभागृह समिती बरखास्त करण्याची मागणी

Goa Assembly Session: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात म्हादईच्या मुद्द्यावर चर्चा सुरू रहावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी थेट सभापतींच्या हौदात धाव घेतल्याच पाहायला मिळालं.
Goa Assembly Session:
Goa Assembly Session:Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा विधानसभेत आज (२२ जुलै) म्हादईच्या प्रश्नावरून गदारोळ पाहायला मिळाला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात म्हादईच्या मुद्द्यावर चर्चा सुरू रहावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी थेट सभापतींच्या हौदात धाव घेतल्याच पाहायला मिळालं. अखेर या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभापतींनी म्हादईच्या मुद्द्यावर चर्चा सुरू ठेवण्यास मान्यता दिल्यानंतर वातावरण शांत झालं.

या वेळी विरोधी पक्षनेते विजय सरदेसाई यांनी म्हादई हाऊस कमिटीवर जोरदार टीका केली. "ही समिती प्रभावीपणे काम करत नाही. समितीची शेवटची बैठक जानेवारी २०२५ मध्ये झाली होती. त्यानंतर एकदाही बैठक झालेली नाही. अशा निष्क्रिय समितीचा उपयोग तरी काय?" असा सवाल सरदेसाई यांनी सभागृहात उपस्थित केला.

Goa Assembly Session:
Goa Assembly: घरे पाडण्‍याचा मुद्दा गाजला! बोरकर, सरदेसाई आक्रमक; CM सावंतांनी भाष्‍य करणे टाळले

दरम्यान, म्हादई नदीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर आतापर्यंत तब्बल १६ कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कर्नाटक सरकार म्हादईचं पाणी वळवत असतानाही गोवा सरकार गप्प का? असा गंभीर प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला. पाण्यासाठी भविष्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यात वाद पेटण्याची शक्यता असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

आम आदमी पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनीही म्हादईच्या मुद्द्यावरून सरकारवर सडकून टीका केली. "म्हादईच्या संदर्भात आम्ही सतत स्थळ तपासणीची मागणी करत आहोत. मात्र, सरकारकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. अशा निष्क्रिय समितीचा उपयोग तरी काय?" असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

Goa Assembly Session:
Goa Road Widening: रस्ता रुंदीकरणाचा वाद! कोलवाळचे राम मंदिरही धोक्यात; स्थानिकांचा तीव्र विरोध

विरोधकांनी यावेळी दर आठवड्याला म्हादईच्या प्रश्नासंदर्भात माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी केली. त्यानंतर झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासात म्हादईच्या मुद्द्यावर चर्चा सुरू ठेवण्यास मान्यता दिली.

विरोधकांनी यावेळी दर आठवड्याला म्हादई प्रकरणासंदर्भात माहिती द्यावी, अशीही मागणी केली. पुन्हा एकदा म्हादईच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढण्याची स्पष्ट चिन्हं दिसत असून, पुढील काही दिवस विधानसभेत या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com