Covid 19 Third Wave Dainik Gomantak
गोवा

Goa COVID19: राज्यात तिसऱ्या लाटेची भिती; सरकारची ढिलाई पडेल महागात ?

Third Wave: भाजी आदी घेऊन येणारे ट्रकचालक, टेप्पो चालक आणि त्यांचे दोन सहकारी यांना तपासणी किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जातोय.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. आचारसंहिताही लागू आहे. मात्र शेजारील राज्यात कोरोनाबाधितांची (Covid-19 Patients) वाढती संख्या गोव्यालाही धोकादायक ठरू शकते. कारण विविध मार्गांद्वारे परराज्यातील लोक चाचणीशिवाय गोव्यात (Goa News) दाखल होत आहेत. ही ढिलाई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते. सरकार फक्त आचारसंहितेचा कालावधी वाढवून गप्प आहे. आचारसंहिता मोडणाऱ्यांवर, कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. (Possibility of third wave of corona epidemic in Goa)

मास्क न लावलेल्यांवर किरकोळ कारवाई होत आहे. स्वतः सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते व कार्यकर्तेच आचारसंहितेचा भंग करून मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पणजीत दर दिवशी मास्क न घालणाऱ्या कमीत कमी 40 जणांवर 200 रुपये दंड आकारणी केली जाते.

तपासणी न करता गोव्यात दाखल

भाजी आदी घेऊन येणारे ट्रकचालक, टेप्पो चालक आणि त्यांचे दोन सहकारी यांना तपासणी किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जातो. त्यांची संख्या पाचही मुख्य सीमा पकडल्यास दिवसाला 1200 ते 1500 च्या आसपास असते. दिवसाला दीड हजार लोक तपासणी न करता गोव्यात दाखल होत आहेत.

सप्टेंबरमध्ये फ्लूचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कोरोना रुग्णही वाढतील. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण गरजेचे असल्याचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT