Goa: कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले!

Goa: १००६ कोरोनाबाधितांपैकी ४७ जण आयसीयूत!!
Goa: Covid vaccination
Goa: Covid vaccinationDainik Gomantak

पणजी : राज्यात कोरोना नियंत्रणात येत असला, तरी गेले काही दिवस बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा नवे कोरोना रुग्ण (New Covid Patients) वाढले (Increase) आहेत. राज्यात जे १००६ सक्रिय कोरोनाबाधित आहेत, त्यातील २३७ जण इस्पितळात, तर उर्वरीत घरी अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. इस्पितळात दाखल असलेल्यांपैकी ४७ कोरोनाबाधित विविध इस्पितळात आयसीयूत आहेत. बांबोळी (Bamboli) येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (Goa Medical College Hospital) ७९ कोरोना रुग्ण दाखल असून त्यातील १७ आयसीयूत आहेत, तर दक्षिण गोवा इस्पितळात (South Goa Hospital) ३६ कोरोना रुग्णांवर उपचार चालू असून २ आयसीयूत आहेत.

Goa: Covid vaccination
डिचोलीत ग्रामीण भागात पावसाळी आजारांची साथ

- दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू
- शुक्रवारच्या कोरोना चाचण्या - 5,526
- नवे कोरोनाबाधित - 109
- बरे झालेले रुग्ण - 93
- आत्तापंर्यतचे कोरोना बळी - 3159
- बरे होण्याची टक्केवारी - 97.58 टक्के

1 ते 7 आॅगस्ट कोरोना आकडेवारी
करोना चाचण्या - 32,903
नवे कोरोनाबाधित - 668
बरे झालेले कोरोनाबाधित - 708
कोरोना मृत्यू - 12

आजचे लसीकरण - 12,245
पहिला डोस - 5,859
दुसरा डोस - 6,389

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com