Possibility of division of votes in Canacona

 
Dainik Gomantak
गोवा

काणकोणात भाजपची उमेदवारी 'दोलायम' अवस्थेत!

कोणालाही उमेदवारी दिल्यास काणकोणमधील भाजपच्या पारंपरिक मतदारांची तीन गटांत विभागणी होणार आहे.

Shreya Dewalkar

काणकोण: काणकोणात (Canacona) भाजपची उमेदवारी दोलायम अवस्थेत आहे. कोणालाही उमेदवारी दिल्यास काणकोणमधील भाजपच्या पारंपरिक मतदारांची तीन गटांत विभागणी होणार आहे. एक गट विद्यमान आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडिस, दुसरा गट माजी मंत्री रमेश तवडकर व तिसरा गट भाजपचे माजी आमदार विजय पै खोत यांची तळी उचलून धरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाजपमधील (BJP) काही प्रमुख कार्यकर्त्यांना फर्नांडिस यांच्या कामाचा धडका बघून उमेदवारी फर्नांडिस यांनाच मिळायला हवी, असे स्पष्ट मत ते व्यक्त करीत आहेत. विजय पै खोत गत निवडणुकीतील (Goa Election) पराभवाचे खापर तवडकर यांच्यावर फोडून गेले सहा महिने अपक्ष उमेदवारीवर ठाम असून, त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. आपल्या निवासस्थानी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मतदारसंघात या कार्यकर्त्यांमार्फत कामही त्यांनी सुरू केले आहे.

‘लोकोत्सव-2021’च्या यशस्वी आयोजनानंतर माजी मंत्री रमेश तवडकर यांनी मतदारसंघात प्रत्येक बूथवर कोपरा बैठका घेण्यास आरंभ केला आहे. सध्या तवडकर व फर्नांडिस आपल्यालाच भाजपची उमेदवारी मिळेल, असा दावा करत आहेत.

पुनरावृत्तीची शक्यता!

फर्नांडिस यांनी काणकोण मतदारसंघात विकास कामांचा धडका लावला आहे. भाजपची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारीवर ते निवडणूक लढविण्याची शक्यता त्याच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काणकोणात (Canacona) गेल्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT