मी कॉंग्रेसचा शिस्तबध्द सैनिक होतो; पण..

स्वतः रेजिनाल्ड यांचे त्याबाबत लोकांना खुले पत्र!
Alex Reginald Lawrence

Alex Reginald Lawrence

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव: कुडतरीतून उमेदवारी व पक्षाचे कार्याध्यक्षपद बहाल करूनही आलेक्स रेजिनाल्ड (Alex Reginald) यांनी कॉंग्रेसचा त्याग का केला व त्यांनी तृणामूल या पर्यायाने गोव्यात नव्या असलेल्या पक्षात का पदार्पण केले असा प्रश्र्न या दिवसांत अनेकांना पडला आहे. स्वतः रेजिनाल्ड यांनीच त्याबाबत लोकांना खुले पत्र लिहून त्याचे स्पष्टीकरण केले आहे.

<div class="paragraphs"><p>Alex Reginald Lawrence</p></div>
पी. चिदंबरम : भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्येच

त्या पत्रांत ते म्हणतात की, आपण कॉंग्रेसचा (Congress) शिस्तबध्द सैनिक होतो. पण, निरुपायास्तव अत्यंत कठीण असा तो निर्णय आपण घेतला. कारण तेथे कोणतेच भवितव्य नव्हते की काम करण्याची संधी नव्हती. त्यामुळे काळजावर एक प्रकारचा दगड ठेवून आपण तो निर्णय घेतला. आपल्या संदर्भात लोकांच्या, विशेषकरून कुडतरीतील लोकांच्या आशा-आकांक्षा व अपेक्षा वेगळ्या होत्या. कॉंग्रेसमध्ये राहून त्या फलद्रूप करता येणार नाहीत याची जेव्हा खात्री पटली तेव्हाच आपण हा निर्णय घेतला होता. पक्षाचे (Political Party) कार्याध्यक्ष पद वगैरे केवळ नावापुरते होते. तेथे काम करण्यास वावच नव्हता. पण, इतरांना ते कळणे कठीण होते. म्हणून निरुपायास्तव आपण या निर्णयाप्रत आलो असे या पत्रांत त्यांनी म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>Alex Reginald Lawrence</p></div>
हिंदूंना फसवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न: सरदेसाई

गोव्याच्या (Goa) भल्यासाठी नेहमीच माझा आग्रह!

गोव्याच्या राजकारणात (Politics) गेल्या दोन दशकांचा अनुभव आपण घेतला. त्यांतून बरेच काही शिकलो, असे नमूद करून आपण बाहेर पडल्याने कॉंग्रेसमधील ज्या कोणाला आपला अडथळा होत होता तो आता दूर होईल, अशी आशा आपण करतो. गोवा व गोमंतकीय यांच्याबाबत आपण कधीच तडजोड केली नाही की यापुढेही करणार नाही असे सांगून आपण सदैव भूमीपुत्रच असेन, असे रेजिनाल्ड यांनी पत्रात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com