Mall de Goa route diversion Dainik Gomantak
गोवा

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Porvorim Road Closure: सण-उत्सवाच्या दिवसांत होणारी गर्दी लक्षात घेता पर्वरी परिसरासह राज्यातील महत्त्वाचे मार्ग व्यवस्थित व सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.

Pramod Yadav

पणजी: पर्वरीतील ओ कोकेरो चौक ते मॉल दी गोवा हा रस्ता पाच दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच बंद केला जाणार आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी तो बंद केला जाणार होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) मंत्रालयात पत्रकारांना या बदललेल्या निर्णयाची माहिती दिली. राज्यभरातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याची सूचनाही सार्वजनिक बांधकाम खात्याला केल्याचे त्यांनी सांगितले.

पर्वरीतील मार्ग गणेशोत्सवापर्यंत सुरळीत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गणेश चतुर्थीच्या पारंपरिक सणानंतर पाच दिवसांनी या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना आणि प्रवाशांची कोणताही गैरसोय होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, सण-उत्सवाच्या दिवसांत प्रवासी आणि भाविकांची मोठी गर्दी रस्त्यावर होत असते. त्यामुळे पर्वरी परिसरासह राज्यातील महत्त्वाचे मार्ग व्यवस्थित व सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.

४४ वर्षांनंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

पाकिस्तानी नागरिक ब्रेंडन व्हॅलेंटाईन क्रैस्टो यांना आज नागरिकत्व (सुधारणा) कायद्यांतर्गत भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. १९८१ पासून त्यांचा संघर्ष सुरू होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा प्रमाणपत्र वितरण सोहळा मंत्रालयात पार पडला.

क्रैस्टो हे रोमन कॅथोलिक असून, २ डिसेंबर २००६ पासून हणजूण येथे वास्तव्यास आहेत. २०१४ मध्ये त्यांचा विवाह भारतीय नागरिक मेरिलीन फर्नांडिस यांच्याशी झाला होता. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गोव्यात आतापर्यंत तीन व्यक्तींना नागरिकत्व (सुधारणा) कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT