Court Verdict: मंत्री मॉविन गुदिन्हो यांना मोठा दिलासा, 4.52 कोटींच्या वीजदर सवलत घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता

Minister Mauvin Godinho Corruption Case: मनोहर पर्रीकरांनी १९९८ साली तत्कालिन वीजमंत्री मॉविन यांच्याविरोधात ४.५२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
Mauvin Godinho power tariff scam 1998 | Goa minister scam acquittal
Minister Mauvin Godinho Power Rebate Scam 1998 | Court VerdictDainik Gomantak
Published on
Updated on

Power Rebate Scam 1898 Goa

पणजी: पंचायत आणि वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांची ४.५ कोटींच्या वीजदर सवलत घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. उत्तर गोवा विशेष न्यायालयाने आज (२५ ऑगस्ट) हा निवाडा दिला. १९९८ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता, त्यावेळी काँग्रेस सरकारमध्ये मॉविन यांच्याकडे वीज खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी होती. या निकालामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यातून मंत्री मॉविन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१९९८ मध्ये उद्योगांना वीजवापरात २५ टक्के सवलत देऊन ४.५२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप तत्कालिन वीजमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यावर करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांना हा घोटाळा उघडकीस आणला होता. २००६ मध्ये मॉविन यांच्याविरोधात घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते.

न्यायाधीश इर्शाद आगा यांनी निकाल देताना मंत्री मॉविन गुदिन्हो यांची निर्दोष मुक्तता केली.

Mauvin Godinho power tariff scam 1998 | Goa minister scam acquittal
फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

मॉविन यांच्या विरोधात करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप विचारात घेण्यासारखे असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे २००७ मध्ये उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. दरम्यान, मॉविन यांची या प्रकरणातून मुक्तता झाली आहे.

दरम्यान, ज्या भाजपने मॉविन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच भाजपमध्ये मॉविन सध्या मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com