Parvari: While giving information about the beating case, Dr. Vinayak Buwaji. Along with Dr. Shailesh Kamat, Dr. Sandeep Naik, Dr. Govind Kumar, Dr. Ajit Mopkar, Dr. Sham Lavande and Dr. Shekhar Salkar.  Goa _30 august 2021.
Parvari: While giving information about the beating case, Dr. Vinayak Buwaji. Along with Dr. Shailesh Kamat, Dr. Sandeep Naik, Dr. Govind Kumar, Dr. Ajit Mopkar, Dr. Sham Lavande and Dr. Shekhar Salkar. Goa _30 august 2021. Datta shirodkar
गोवा

Goa : पर्वरी पोलिसांकडून तीन संशयितांना अटक

Datta Shirodkar

पर्वरी : जेएमजी (jmj Hospital) हॉस्पिटलात सेवा देणारे स्त्रीरोग (Gynecologist) व प्रसूतीतज्ज्ञ (obstetrician) डॉ. अमोल तिळवे यांना मारहाण प्रकरणी (Attack on the doctor) मिनेश नार्वेकर यांच्या सात साथीदार पैकी तिघांना आज उशिरा पर्वरी पोलिसांनी अटक (Arrested) केले आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे रोहीश साळगावकर (२७), कृष्णा नाईक (३२) व रोहिल साळगावकर (२७) अशी आहेत, अशी माहिती निरीक्षक निनाद देऊळकर यांनी दिली.

संशयित मिनेश नार्वेकर (पीडीए कॉलनी- पर्वरी) व साथीदारांविरूद्ध तक्रार दाखल करून दोन दिवस उलटूनही अटक न केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आज पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन उपअधीक्षक एडविन कुलासो आणि निरीक्षक निनाद देऊळकर यांना जाब विचारला. संशयित नार्वेकर आणि त्याच्या सात साथीदारांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी संशयितांना बुधवार १ सप्टेंबरपर्यंत अटक केली नाही, तर पुढे घडणाऱ्या घटनांना पोलिस जबाबदार राहातील, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनाही डॉक्टरांनी या प्रकरणी निवेदन दिले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीही त्वरित कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली, परंतु इतर साथीदार अद्याप मोकळेच आहेत. मोर्चा काढून डॉक्टरांनी केलेल्या मागणीची दखल पोलिसांनी घेतल्यानेच तिघांना अटक केले.


पर्वरी काढलेल्या मोर्चा डॉ. शैलेश कामत, डॉ. संदीप नाईक, डॉ. गोविंद कुमार, डॉ. अजित मोपकार, डॉ. शाम लवंदे आणि डॉ. शेखर साळकर यांच्यासह सुमारे दोनशेहून अधिक डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी डॉ. तिळवे मारहाण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन संशयित मिनेश नार्वेकर आणि त्यांच्या साथीदारांवर त्वरित गुन्हा दाखल केला असून सध्या तपास योग्य दिशेने सुरू आहे. संशयिताना त्वरित अटक केले जाईल, असे आश्वासन पोलिस उपअधीक्षक एडविन कुलासो यांनी दिले आहे.
जीवाला धोका निर्माण होईल. त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल. कोविडच्या काळात डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा केली आहे. याचे भान सर्वांनी ठेवायला पाहिजे, असे डॉ. विनायक बुवाजी यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत राहिल्या तर आम्ही रस्त्यावर येऊन मोर्चा काढणार नाही, पण निश्चितपणे संप पुकारला जाईल. त्यामुळे सर्व वैद्यकीय सेवा कोलमडून पडतील. तेव्हा पोलिसांनी त्वरित संशयिताला अटक करावे. आमच्यावर बेमुदत संप करण्याची पाळी आणू नये, असे शैलेश कामत यांनी सांगितले.
संशयितांनी डॉ. तिळवे यांच्यावर हा हल्ला पूर्वनियोजित पद्धतीने केला आहे. तसेच या बालक मृत्यूप्रकरणी डॉ. तिळवे यांना जबाबदार ठरविणे हे चुकीचे आहे. कारण या बालकाला जन्मताच दोष असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. डॉ. तिळवे यांना सर्वस्वी जबाबदार ठरवून मारहाण करणे चुकीचे आहे. जर कुटुंबियांना न्याय हवा होता, तर त्यांनी मेडिकल कौन्सिल किंवा अन्य ठिकाणी न्याय मागायला हवा होता, असे डॉ. गोविंद कामत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT