Goa: द. गोवा जिल्हा इस्पितळात लवकरच हृदय रोग विभाग

कासावली (Cansaulim) येथे आरोग्य मंत्री राणे यांची घोषणा (Goa)
Goa Health Minister Vishwjit P Rane
Goa Health Minister Vishwjit P Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: राज्य सरकार (Goa BJP Govt) गोमंतकियांना सवोत्तम आरोग्य सेवा देण्यास बांधिल असुन कोविडच्या काळात राज्यात व देशात ज्या आरोग्य सुविधा तयार झाल्या त्याचा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (GMC) ज्या प्रकारच्या सुविधा आहेत त्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन 30 नोव्हेंबर 2021 पुर्वी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात (S. Goa District Hospital) हृदय रोग विभाग सुरु केला जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यानी केली.

Goa Health Minister Vishwjit P Rane
Goa: ... या कारणामुळे दक्षिण गोव्यात चालू आहे मद्यपान जागृती

कसावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Cansaulim Health Center) उदघाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी बोलताना त्यानी वरील घोषणा केली. राज्यातील हे 18वे प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे. शिवाय कर्क रोगावर उपचार करण्यासाठी सर्वसुविधा युक्त खास कर्क रोग इस्पितळ सरकार ऑक्टोबर पुर्वी कार्यान्वित करेल असेही राणे यांनी पुढे सांगितले. या आरोग्य केंद्रामध्ये डायलिसिस, एक्स-रे, अल्ट्रा साउंड, कॅज्युअल्टी, तातडीच्या व स्टेमी कार्यक्रमा अंतर्गत सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, जीएमसी इस्पितळातील कार्डिओलोजिस्ट डॉ. गुरुप्रसाद, जीडीआयडीसी उपाध्यक्ष, आमदार जोशुवा डिसोझा, कुठ्ठाळी आमदार एलिना साल्ढाना, कासावली सरपंच फेर्विन साल्ढाना हे मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com