Goa Air Pollution Dainik Gomantak
गोवा

Goa Air Pollution: गोव्यासाठी धोक्याची घंटा! पर्वरी, पणजी परिसरात घसरली हवेची गुणवत्ता; नागरिकांच्या आरोग्याला धोका

Porvorim Panaji Air Pollution: पर्वरीसह पणजी व आसपासच्या परिसरात हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून वायू गुणवत्ता निर्देशांक १५१ पर्यंत पोहोचला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्वरीसह पणजी व आसपासच्या परिसरात हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून वायू गुणवत्ता निर्देशांक १५१ पर्यंत पोहोचला आहे. हा स्तर ‘अस्वास्थ्यकारक’ श्रेणीत मोडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, हवेतील सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण वाढले असून पीएम १० चे प्रमाण ६५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, तर पीएम २.५ चे प्रमाण ५६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदवले गेले आहे. या वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनास त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ तसेच दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

दरम्यान, जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पणजीचा क्रमांक ७०५ वा लागल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यांवरील धूळ, वाहनांची वाढती संख्या तसेच सुरू असलेली बांधकामे ही प्रदूषणवाढीची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पर्वरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ते उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात धुळीचे प्रदूषण होत आहे. पावसाळ्यात मात्र, सर्वत्र चिखल व्हायचा मात्र, पाऊस ओसरताच पुन्हा धुळीचे साम्राज्य पसरायचे. त्यामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

श्‍वसनविकारग्रस्तांनी घ्यावी काळजी!

आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे आणि मास्कचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे. प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून धूळ नियंत्रण व वाहतूक व्यवस्थापनासाठी तातडीचे उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT