Porvrorim Murder  Dainik Gomantak
गोवा

Porvorim Murder: पर्वरीतील तरूणीचा प्रेमप्रकरणातून खून; प्रियकराचे कृत्य; आंबोलीत फेकला मृतदेह

युवतीने तक्रार करूनही पोलिसांनी तरूणाला सोडून दिले होते

Akshay Nirmale

Porvorim Murder: गोव्यातील खूनांचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या तीन दिवसात राज्यात चार खून झाले होते. त्यातच आता आणखी एक खूनाची घटना समोर आली आहे. पर्वरीतील एका तरूणीचा प्रेमप्रकरणातून खून झाला आहे.

कामाक्षी (वय ३०) असे या तरूणीचे नाव आहे. ती पर्वरीत राहत होती. म्हापसा पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या पुर्वाश्रमीच्या प्रियकरानेच हा खून केल्याचे समोर येत आहे. सध्या फॉरेन्सिकचे पथक आंबोली घाटात तपास करत आहे. तिथे कामाक्षीच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

तरूणीच्या माजी प्रियकरानेच हा खून केल्याचा संशय आहे. तरूणीच्या कुटूंबियांनी तसा आरोप केला आहे. प्रकाश चुंचवाड (वय २२) असे या संशयित तरूणाचे नाव आहे. त्याचे पर्वरीमध्ये गॅरेज आहे. दरम्यान, कामाक्षीचा खून करून तिचा मृतदेह आंबोलीत फेकण्यात आला होता. पोलिसांनी प्रकाशविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश आणि कामाक्षी यांचे प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे. तथापि, कालांतराने दोघांमध्ये ब्रेकअप झाले. पण त्यानंतरही प्रकाश कामाक्षीला त्रास देत होता, असे समोर येत आहे. त्यातून दोघांमध्ये वारंवार खटके उडाले होते.

रिलेशनशिप कंटिन्यू करण्यास कामाक्षीने नकार दिला होता. त्या रागातून प्रकाशने हा खून केल्याचा संशय आहे. खरे तरं, म्हापसा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित युवतीने तिचा खून होण्यापुर्वी काही तास आधी तक्रार दाखल केली होती.

पण, पोलिसांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही, असे दिसते. संबंधित तक्रारीत कामाक्षीने प्रकाशने तिच्यावर हल्ला केल्याचे म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी दोघांची समजूत काढून प्रकरण मिटवले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयित प्रकाश चुंचवाड दम दिला होता.

तसेच त्याच्याकडून तोंडी आणि लेखी हमी घेऊन त्याला सोडून दिले होते. त्यावेळेस प्रकाशने पोलिसांसमोर संबंधित युवतीला परत कधी त्रास देणार नाही, तिच्या आयुष्यात पुन्हा हस्तक्षेप करणार नाही, असे म्हटले होते.

तेव्हा पोलिसांनी कामाक्षीला घरी सोडण्याची व्यवस्था केली होती. पण तिने मैत्रिणींसमवेत घरी जाण्यास प्राधान्य दिले. खून होण्यापुर्वी कामाक्षी शेवटची या मैत्रिणींसमवेतच दिसून आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT