गुड न्यूज! गोव्यात भाजीपाला उत्पादन प्रतीहेक्टरी 11,681 किलोवर, तर फलोत्पादन 9,854 किलोवर; भात उत्पादनात मात्र घट

सर्वाधिक उत्पादन सासष्टी, काणकोण, पेडणे, तिसवाडी, फोंडा तालुक्यात
Goa Vegetable, Fruit Cultivation on Rise:
Goa Vegetable, Fruit Cultivation on Rise: Dainik Gomantak

Goa Vegetable, Fruit Cultivation on Rise: गोव्यात भाजीपाला आणि फळांच्या लागवडीत वाढ झाली आहे. राज्य सरकारकडील ताज्या माहितीनुसार, राज्यातील स्थानिक भाजीपाला आणि फळांच्या लागवडीने 2022-23 मध्ये उच्चांक गाठला आहे.

ज्यामध्ये भाजीपाला लागवडीत 18 टक्के आणि फळ लागवडीत 13 टक्के वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक भाजीपाला, फळ उत्पादन सासष्टी, काणकोण, पेडणे, तिसवाडी आणि फोंडा तालुक्यात होत आहे. राज्याच्या कृषी संचालकांच्या हवाल्याने स्थानिक इंग्रजी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

राज्यात भेंडी, काकडी, दुधीभोपळा यासारख्या भाज्या आणि चिकू, फणस, पपई, अननस इत्यादी फळांच्या उत्पादनातील वाढ उत्साहवर्धक आहे. कारण ती सलग तिसऱ्या वर्षी दिसून आली आहे. याचा फायदा गेल्या तीन वर्षात गोव्यातील शेतकऱ्यांनाही होताना दिसून येत आहे.

Goa Vegetable, Fruit Cultivation on Rise:
Goa Super Blue Moon 2023: गोव्यात गुरूवारी पाहता येणार दुर्मिळ सुपर ब्लू मून; यानंतर थेट 2026 मध्ये दिसणार...

सध्या राज्यात भाजीपाल्याचे उत्पादन 11,681 किलोग्राम प्रति हेक्‍टर होत आहे. जे पुर्वी 2020-21 मध्ये 9,762 किलो प्रति हेक्‍टर होते. तर बागेतील फळांचे उत्‍पादन 2020-21 मध्ये 8,258 किलो प्रति हेक्‍टर होते. ते आता 9,854 किलो प्रतिहेक्‍टर इतके झाले आहे.

कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी म्हटले की, शेतकरी अधिक भाजीपाला आणि फळे पिकवत आहेत. कारण त्यांना गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाने (GSHC) उत्पादनाची विक्री करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील सर्व भाज्या आणि फळे खरेदी करण्याची सरकारची तयारी आहे.

GSHC स्थानिक भाजीपाला आणि फळे बाजारभावावर 150 टक्के प्रीमियमवर खरेदी करते. ज्यामुळे शेतकर्‍यांसाठी लागवड अतिशय व्यवहार्य होते.

भात उत्पादनात घट

दरम्यान, राज्यात भात पिकाचे उत्पादन वर्षानुवर्षे घटत असून 2022-23 मधील उत्पादन 1 लाख 32 हजार 594 टन इतके आहे. शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळत आहेत, कारण तिथे मजुरांची गरज कमी असते.

जर त्यांना GSHC ला विकायचे नसेल तर ते उत्पादन खुल्या बाजारात सहज विकले जाऊ शकते, असेही अल्फोन्सो यांनी म्हटले आहे.

Goa Vegetable, Fruit Cultivation on Rise:
गोवा बनणार सर्व गावांमध्ये बँक असलेले राज्य; बँक नसलेल्या 5 गावांमध्ये इंडिया पोस्ट सुरू करणार शाखा

अनेक किचन गार्डन्स सुरू

आरोग्याबाबत सजग राहण्याच्या सध्याच्या ट्रेंडमुळेही अनेक रहिवासी स्वतःच भाजीपाला अल्प प्रमाणात पिकवत आहेत. राज्यभरात अनेक किचन गार्डन सुरू झाले आहेत. त्यामुळे गोव्याच्या भाजीपाला लागवडीला चालना मिळत आहे.

पर्यटकांच्या संख्येमुळे हॉटेल्सना मागणी जास्त आहे. गाजर, कोबी, फ्लॉवर, कांदा, बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या अनेक भाज्या देखील आहेत, ज्या व्यावसायिकरित्या पिकवता येत नाहीत आणि म्हणूनच शेजारच्या राज्यांमधून आणल्या पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com