Khapreshwar Temple Porvorim, CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Khapreshwar Temple: '..आम्हाला राजकारण करायचे नव्हते'! मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; खाप्रेश्वर देवस्थान पुनःउभारणीस प्रारंभ

Porvorim Khapreshwar Temple: मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ज्यांनी आरोप केले होते की, आम्ही आणि पंच सदस्य देवाच्या विरोधात आहोत, त्यांनी केवळ राजकारण केले.

Sameer Panditrao

पणजी: खाप्रेश्वर देवस्थानाच्या पुनः उभारणीच्या कामास सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ झाला. यावेळी पारंपरिक पूजा करत त्यांनी देवस्थानाशी संबंधित वादांवर सडेतोड भूमिका मांडली.

आम्ही कधीही देवाच्या विरोधात नव्हतो आणि आजही नाही. यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा थेट आरोप करत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पर्वरी येथे झालेल्या या कार्यक्रमात पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार रोहन खंवटे, पंच सदस्य आणि परिसरातील श्रद्धावान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ज्यांनी आरोप केले होते की, आम्ही आणि पंच सदस्य देवाच्या विरोधात आहोत, त्यांनी केवळ राजकारण केले. पण आम्ही राजकारण हे देव, देश, धर्म यांचा आदर ठेवूनच केले आहे. जेव्हा मंदिर जागेवरून बाजूला हलवले, तेव्हाच आम्ही स्पष्ट सांगितले होते की, सरकारच त्याची पुनर्बांधणी करणार.

आज तीच जबाबदारी आम्ही निभावत आहोत. आम्हाला राजकारण करायचे नव्हते, आणि ज्यांना करायचे आहे, त्यांनी करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण काम पार पडत आहे आणि भाविकांच्या श्रद्धेला शासनाचा आधार लाभत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना अनेक गैरसमज झाले. लोकांनी आमच्यावर वैयक्तिक आरोप केले. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः लोकांशी संवाद साधला, त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यांना देवाच्या प्रसादाचा स्वीकार करण्यास सांगितले. प्रसाद घेऊन जागा निश्चित करण्यात आली आणि आज त्या पुनर्निर्माण कामाची सुरुवात झाली.
रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Beti Ferry Boat: 'बेती' का बुडाली? तपास पुन्हा 'बंदर कप्तान'कडे, प्राथमिक चौकशीत मानवी चुकीने दुर्घटनेचा निष्कर्ष

Comunidade Land: कोमुनिदादच्या जमिनीत हस्तक्षेप नकोच! आसगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध

Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

Paper Leak Issue: विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकांची चोरी उघड; चौकशी समितीचा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर ठपका

Rashi Bhavishya 17 July 2025: प्रवासाचे योग, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील; मान-सन्मान वाढेल

SCROLL FOR NEXT