कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! 'मत्स्यगंधा एक्सप्रेस'मधून 50 लाखांचं सोनं, 34 हजारांची रोकड जप्त! हरियाणातील 4 जण अटकेत

Konkan Railway Police Action: कोकण रेल्वे पोलिसांनी मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ५० लाख रुपये किमतीचे सोने आणि ३४,५०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

कोकण रेल्वे पोलिसांनी मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ५० लाख रुपये किमतीचे सोने आणि ३४,५०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात हरियाणा राज्यातील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये कोकण रेल्वे पोलिसांनी संशयाच्या आधारावर काही प्रवाशांची तपासणी केली असता त्यांच्या सामानातून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोकड असल्याचे आढळून आले.

या प्रकरणात राजेश राम, मनोज कुमार आणि जितेंद्र सिंह यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींचे मूळ निवासस्थान हरियाणामध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडे सोन्याचे दागिने कसे आणि कुठून आले, तसेच त्यांचा नेमका उद्देश काय होता याबाबत चौकशी सुरू आहे.

Konkan Railway
Goa Panchayat: गोव्यातील पंचायतींसाठी नवी माहिती! महिन्यातून होणार 4 बैठका; खात्‍याकडून मसुदा अधिसूचना जारी

जप्त करण्यात आलेले सोनं आणि रोकड प्राथमिक तपासणी आणि पंचनाम्यानंतर मंगलुरू रेल्वे पोलीस दलाकडे (RPF) सुपूर्द करण्यात आले आहे. पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया तेथून पुढे चालवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Konkan Railway
Goa Accident: अनर्थ टळला! चालत्या 'कदंबा'च्या छतावर पडले स्टील बार; अनेक प्रवासी जखमी

या कारवाईमुळे रेल्वे मार्गाचा वापर करून होणाऱ्या गैरकृत्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणांची दक्षता किती महत्त्वाची आहे हेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे. रेल्वे प्रवाशांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com