

स्मार्टफोनची निवड करताना ५जी कनेक्टिव्हिटी, दमदार बॅटरी, चांगला कॅमेरा आणि मोठा डिस्प्ले यांना सध्या सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे, आता हे सर्व फीचर्स महागड्या फोनमध्येच मिळतात असे नाही. भारतीय बाजारपेठेत १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीतही उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारे ५जी फोन उपलब्ध आहेत. त्यापैकी पाच बेस्ट पर्याय आम्ही तुमच्यासमोर आणले आहेत. या यादीत सॅमसंग, मोटोरोला, विवो, आयक्यूओ आणि रियलमी या कंपन्यांचे फोन समाविष्ट आहेत.
या बजेट सेगमेंटमध्ये सॅमसंगचा हा फोन वापरकर्त्यांसाठी एक मजबूत पर्याय ठरू शकतो. यात 6.7-इंच Super AMOLED डिस्प्ले असून त्यातून उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतो. यात Exynos चिपसेट आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी दैनंदिन वापर आणि कंटेंट स्ट्रीमिंगसाठी योग्य आहे.
या किंमत श्रेणीत Motorola चा हा फोन विशेष लक्ष वेधून घेतो. यात 50MP + 2MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, तर सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच 6.5-इंच IPS LCD डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. कमी बजेटमध्ये चांगला आणि टिकाऊ फोन शोधत असल्यास हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
विवोचा हा फोन डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये प्रीमियम फील देतो. यात 6.68-इंच IPS LCD डिस्प्ले असून तो 1000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी 50MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. त्याचबरोबर 6500mAh मोठी बॅटरी आणि Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर दिला असून गेमिंगसाठीही तो योग्य आहे.
आयक्यूओ सतत परफॉर्मन्सवर भर देणारे फोन बाजारात आणत असते. या फोनमध्ये MediaTek 7300 चिपसेट, 6.72-इंच IPS LCD डिस्प्ले, तसेच 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 50MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा दिला असून परफॉर्मन्स–centric वापरकर्त्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.
या यादीतील शेवटचा आणि किफायतशीर फोन म्हणजे Realme P3x. यात 6.72-इंच 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर, तसेच 6000mAh बॅटरी आहे. लांब काळ वापर, गेमिंग आणि 5G अनुभवासाठी हा योग्य ठरू शकतो.