Crime News: क्रूरता! लग्नाला काही तास उरले असताना प्रियकर बनला 'मारेकरी', पैशांच्या वादातून प्रेयसीला संपवलं

Gujrat Crime News: गुजरातमधील भावनगर येथे प्रेमसंबंधातून विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या २२ वर्षीय तरुणीची तिच्याच मंगेतराने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरातमधील भावनगर येथे प्रेमसंबंधातून विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या २२ वर्षीय तरुणीची तिच्याच मंगेतराने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आनंदाच्या वातावरणात सजलेलं घर, दिव्यांची रोषणाई, मेहंदी-हळदीची रंगत आणि विवाहाच्या तयारीने भरलेला माहोल क्षणात दुःखाच्या सावटाखाली ढकलला.

सोनी राठोड आणि साजन बरैया हे दीड वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कुटुंबीयांच्या विरोधानंतरही अखेर दोघांच्या लग्नाला संमती मिळाली होती. १५ नोव्हेंबरला त्यांचा विवाह सोहळा होणार होता, मात्र त्याआधीच साजनने सोनीची निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप आहे.

सोनीच्या मेहंदी समारंभात तिने हातावर “आय लव्ह साजन” आणि “अखंड सौभाग्यवती” असे लिहिले होते. समारंभात दोघेही अत्यानंदात दिसत होते. पण दुसऱ्याच दिवशी, म्हणजे विवाहाच्या काही तास आधी, परिस्थिती पूर्णपणे बदलली.

Crime News
Goa Panchayat: गोव्यातील पंचायतींसाठी नवी माहिती! महिन्यातून होणार 4 बैठका; खात्‍याकडून मसुदा अधिसूचना जारी

समोर आलेल्या माहितीनुसार, घरी पैशांवरून वाद झाला आणि या वादातून साजनने आपला संताप अनावर होऊन लोखंडी पाईपने सोनीवर वार केले. वार इतके गंभीर होते की तिच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आणि ती जागीच कोसळली. इतकंच नव्हे तर आरोपानुसार, साजनने तिचं डोकं भिंतीवर आपटून गंभीर जखम केली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

घरातील लोक झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना गोंधळाचा आवाज ऐकू आला. खोलीत धाव घेतल्यानंतर त्यांना सोनी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Crime News
Goa Accident: अनर्थ टळला! चालत्या 'कदंबा'च्या छतावर पडले स्टील बार; अनेक प्रवासी जखमी

या प्रकरणी गंगाजलिया पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी साजन बरैया फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या शोधासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी आरोपीला हिंसक आणि संभाव्य धोकादायक असल्याचेही नमूद केले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आरोपीचा लवकर शोध घेण्याची हमी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com