Fire News Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: गोव्यात आगीचे तांडव! एकाच दिवशी आगीच्या 4 दुर्घटना; रेस्टॉरंट-गोदाम भस्मभात, 50 लाखांहून अधिक नुकसान

Goa Fire Incident: राज्यात ठिकठिकाणी आगीच्या चार दुर्घटना घडल्या. पर्वरीत ‘घरान’ हे रेस्टॉरन्ट भस्मसात झाले. कळंगुट येथे एका गोदामाला आग लागली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा/पणजी : राज्यात ठिकठिकाणी आगीच्या चार दुर्घटना घडल्या. पर्वरीत ‘घरान’ हे रेस्टॉरन्ट भस्मसात झाले. कळंगुट येथे एका गोदामाला आग लागली. म्हापसा येथे एका घराचा काही भाग खाक झाला, तर दवर्लीत दोन गोदामे आगीमुळे जळाली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली. पर्वरी येथील साई सर्व्हिससमोरच्या ‘घरान’ रेस्टॉरंटला पहाटे भीषण आग लागली. या आगीत रेस्टॉरंट जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार हॉटेलमालकाचे सुमारे ३० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे नसून तो घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आग इतकी भीषण होती, की काही वेळेतच ज्वाळांनी संपूर्ण रेस्टॉरंटला वेढले. अग्निशमन दलाला पहाटे ४.२८ वाजता या घटनेची माहिती मिळाली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. पर्वरी अग्निशमन दलाचा एक आणि मुख्यालयातील एक बंब आग विझविण्यासाठी वापरला.

सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी डी. जी. पेडणेकर यांनी दिली.

यावेळी प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्टॉरंटच्या आवारातील ११ गॅस सिलिंडर्स बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.

मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पर्वरी अग्निशमन दलाचे अधिकारी डी. जी. पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटमालकाने या दुर्घटनेमागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले.

म्हापशात घराचे दीड लाखाचे नुकसान

तेलंगण नगर, खोर्ली- म्हापसा येथील प्रमोद कर्पे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर आज सकाळी ११.३० च्या सुमारास आग लागून दीड लाखाचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. घराच्या खालील मजल्यावर कर्पे कुटुंबीय राहात होते. घराच्या छतावरून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी कर्पे कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यांनी टाकीतील पाणी वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत टीव्ही संच, फर्निचर, तसेच काही व्यावसायिक दस्तावेज जळाले. म्हापसा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.

दवर्लीत दोन गोदामे भस्मसात

दवर्ली येथे रात्री लागलेल्या आगीत दोन लागून असलेली गोदामे जळून खाक झाली. एका बंगल्याच्या खाली पार्किंग जागेत ही गोदामे होती. त्यात लाकडी साहित्य होते. गोदामावर असलेल्या एका फ्लॅटलाही आगीची झळ पोहोचली. अग्निशमन दलाने ही आग विझविली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मालमत्तेचे नुकसान आणि तोट्याचे मूल्यांकनही झालेले नाही.

रेस्टॉरंट मालकाला दिली होती धमकी

‘घरान’ रेस्टॉरंट मालकाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे काही कौटुंबिक वाद सुरू आहेत आणि हल्लीच त्यांना एका व्यक्तीकडून धमकीही मिळाली होती. त्यामुळे ही आग मुद्दाम लावली असल्याचा संशय मालकाने व्यक्त केला आहे. आम्ही ही माहिती पोलिसांना दिली असून पोलिस तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडणार गूढ

‘घरान’ रेस्टॉरंट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांना सुपूर्द करण्यात येणार असून, त्यातून आगीचे नेमके कारण आणि संशयित व्यक्तीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंटचे फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र, स्वयंपाकघराला आग न लागल्याने मोठी हानी टळली.

रंगाचे गोदाम खाक

नायकावाडा-कळंगुट येथील बांधकाम सुरू असलेल्या सागा हॉटेल इमारतीमधील गोदामाला सकाळी ६.५० च्या सुमारास आग लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर गोदामात रंग (पेंट) आणि इतर साहित्य ठेवले होते. या साहित्याला आग लागून ते भस्मसात झाले. पिळर्ण, पर्वरी व म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT