Canacona bus fire
Canacona bus fireDainik Gomantak

Canacona Bus Fire: आगीत खाक झालेला 'तो' बालरथ नव्हताच! काणकोण स्कूलबसप्रकरणी उलगडा; घातपाताची शक्यता मावळली

Canacona School Bus Fire: नववर्षाच्या संध्याकाळी माशे येथील निराकार शिक्षण संस्थेच्या बसला आग लागून खाक झाली. ही निराकार संस्थेची खासगी बस होती.
Published on

काणकोण: नववर्षाच्या संध्याकाळी माशे येथील निराकार शिक्षण संस्थेच्या बसला आग लागून खाक झाली. ही निराकार संस्थेची खासगी बस होती. या प्रकारामागे घातपाताची शक्यता संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी नाकारली.

ही आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच दिवशी बस सर्व्हिस सेंटर वरून धुवून आणली होती, त्यामुळे पाणी असल्यामुळे शॉर्ट सर्कीटची शक्यता नाकारता येत नसल्याचे नाईक यांनी सांगितले.

Canacona bus fire
Canacona School Bus Fire: काणकोणात स्कूलबसला भीषण आग! बस संपूर्णपणे भस्मभात; सुदैवाने जीवितहानी टळली

ही बस ज्या शेडमध्ये होती त्याठिकाणी आणखी दोन वाहने ठेवण्यात येत होती, मात्र सुदैवाने गुरूवारी ती त्या ठिकाणी नव्हती.आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल सुमारे अर्ध्या तासाने घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्यापूर्वी बस जळून खाक झाली.

Canacona bus fire
Arpora Nightclub Fire: हडफडेतील क्लब संरचना मूलतःच बेकायदेशीर, व्यापार परवाना नाही हे माहित होते; पंचायत सचिवाची जबानी

बालरथ, शाळा बसचा प्रश्न ऐरणीवर

काणकोणमध्ये खासगी व सरकारी शाळा, आयटीआय व महाविद्यालयांसाठी बालरथाची सेवा उपलब्ध आहे. यापैकी काही बालरथ व शाळा बस संस्थांच्या मैदानावर उघड्यावर पार्क करण्यात येतात.

गॅरेज सोय नाही, त्यामुळे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. काही संस्थांमध्ये रात्रपाळीला चौकीदारही नाही. काही सरकारी शाळांसाठी कदंब बसची सेवा आहे, त्या सुरक्षित कदंब स्थानकावर पार्क करण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com