Porvorim Tree Relocation Issues Dainik Gomantak
गोवा

Porvorim: पर्वरीतील वृक्ष स्थानांतर प्रक्रिया अयोग्य! ‘डॉक्टर ट्री’ अहवालावर मोदींची टिप्पणी

Porvorim Tree Relocation Issues: पर्वरीतील उड्डाण पुलाच्या रेषेत अडथळा येत असलेल्या जुन्या झाडांचे स्थानांतरीत करताना ‘डॉक्टर ट्री’ एजन्सीने अवलंबिलेली प्रक्रिया अयोग्य दर्जाची आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्वरीतील उड्डाण पुलाच्या रेषेत अडथळा येत असलेल्या जुन्या झाडांचे स्थानांतरीत करताना ‘डॉक्टर ट्री’ एजन्सीने अवलंबिलेली प्रक्रिया अयोग्य दर्जाची आहे. झाडांच्या जगण्याची फारशी काळजी घेतली गेलेली नाही. या झाडांचे अस्तित्व सुनिश्‍चित करण्यासाठी तसेच ती जगण्यासाठी स्थानांतरित स्थळे योग्य पद्धतीने निवडण्याची गरज आहे, असा निष्कर्ष व शिफारस याचिकादाराने नियुक्त केलेल्या लँडस्केप डिझाईनर तज्ज्ञ पराग मोदी यांनी अहवालात केली आहे.

पर्वरीतील (Porvorim) श्रद्धास्थान असलेल्या वटवृक्षासंदर्भात योग्य प्रक्रिया व काळजी घेण्यासंदर्भात वन खात्याच्या कार्यालयात येत्या शुक्रवारी (३१ जानेवारी) वन खात्यासह याचिकादार, सार्वजनिक बांधकाम, ‘डॉक्टर ट्री’ एजन्सीचे अधिकारी तसेच लँडस्केप तज्ज्ञ मोदी यांची संयुक्त बैठकीत चर्चा होणार असून त्याच्या नियोजनाचा अहवाल पुढील मंगळवारी (४ फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केला जाणार आहे. पर्वरी येथील जुनी झाडे स्थानांतरप्रकरणी ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याबाबत पर्याय सुचविला तो खंडपीठाने मान्य केला. या झाडांच्या स्थानांतरितासाठी येणाऱ्या खर्चावर समझोता केला जाणार नाही असे त्यांनी खंडपीठाला स्पष्ट केले.

सहापैकी पाच जुनी झाडे ‘डॉक्टर ट्री’ एजन्सी कंत्राटदाराने स्थानांतरित केली आहेत. ही झाडे स्थानांतरीत करत त्यांच्या मोठ्या फांद्या तसेच खोलवरील मुळे कापण्यात आली आहेत. त्यामुळे या झाडे जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे, असे लँडस्केप डिझाईनर मोदी यांनी या झाडांची तपासणी करून दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. ही झाडे जलाशयाजवळील भातशेतीच्या क्षेत्रात स्थानांतरित करण्यात आली आहेत. झाडांची छाटणी केल्याने प्रजाती ओळखणे अवघड झाले आहे व त्यांच्या पुनर्प्राप्तीच्या क्षमेतवर गंभीर परिणाम झाला आहे. झाडाची मुळे अधिक प्रमाणात कापण्यात आली आहेत, ज्यामुळे झाडांची पोषक तत्वे व पाणी शोषणाची क्षमता धोक्यात आली आहे. वृक्ष वटवृक्ष म्हणून ओळखणे अशक्य झाले आहे.

खर्च टाळण्यासाठी हलक्या यंत्रांचा वापर

स्थानांतरितावेळी हाताळणी निकृष्ट दर्जाची होती, कारण खर्च कमी करण्यासाठी जेसीबी व लहान क्रेन यासारखी हलकी यंत्रे वापरली गेली, अशी टिप्पणी तज्ज्ञ मोदी यांनी केल्याची माहिती याचिकादारतर्फे ॲड. नॉर्मा आल्वारिस यांनी खंडपीठाला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT