Goa’s Porvorim Flyover: 'पर्वरी'तील डांबरीकरण कधी? धूळप्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केली? खंडपीठाने मागितला 'बार चार्ट'

Porvorim Flyover: खोदकामामुळे होणारे धूळप्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, याचा उल्लेख त्यात करावा असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. ही सुनावणी आता २७ जानेवारीला होणार आहे.
Porvorim Flyover
Porvorim FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bench About Porvorim Flyover Construction Traffic Alternate roads

पणजी: पर्वरीतील उड्डाणपुलाच्या कामावेळी महामार्गाच्या बाजूने सुरळीत वाहतूक व्‍हावी यासाठी पर्यायी रस्त्यांच्‍या उर्वरित डांबरीकरणाचे काम व अभियांत्रिकी आराखड्याची माहिती देणारा ‘बार-चार्ट’ येत्या गुरुवारपर्यंत (२३ जानेवारी) सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कंत्राटदाराला दिला.

तसेच खोदकामामुळे होणारे धूळप्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, याचा उल्लेख त्यात करावा असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. ही सुनावणी आता २७ जानेवारीला होणार आहे.

पर्वरी महामार्गावरील पर्यायी रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण कामाची तपासणी करून त्याचा अहवाल आज सादर करण्यास गोवा खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी (महामार्ग विभाग) तो अहवाल सादर केला. गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, कंत्राटदाराने अनेक ठिकाणी डांबरीकरण केले असले तरी पूर्णपणे काम झालेले नाही. काही ठिकाणी महामार्गाच्या बाजूला पर्यायी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

तेथे डांबरीकरण होणे बाकी आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी खंडपीठाला दिली.

जनहित याचिकेत हस्तक्षेप याचिका असलेल्या पर्वरी रहिवाशांतर्फे ॲड. अभिजीत गोसावी यांनी यावेळी बाजू मांडताना सांगितले की, रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्याने मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत असून स्थानिक व वाहनचालकांना मन:स्‍ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला या धूळप्रदूषणावर देखरेख ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी खंडपीठाला केली.

Porvorim Flyover
Porvorim Flyover: 88 पैकी 40 खांबांचे काम पूर्ण! पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर

दिवसातून चारवेळा पाण्‍याची फवारणी

ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्या रस्त्यांवर धूळप्रदूषण होऊ नये म्हणून पाण्याची फवारणी दिवसातून चारवेळा केली जात आहे, अशी बाजू कंत्राटदाराने मांडली. यावेळी गोवा खंडपीठाने हस्तक्षेप करत पर्वरी महामार्गाच्या बाजूने सुरू असलेल्या पर्यायी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम कधी पूर्ण होणार? त्यानंतर डांबरीकरण किती दिवसांत केले जाईल? याची सविस्तर माहिती येत्या दोन दिवसांत द्यावी असे निर्देश कंत्राटदाराला दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

heavy vehicles allowed on Margao flyover
bombay high court goa bench illegal land filling order
Porvorim Flyover
Digambar Kamat Porvorim flyover announcement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com