Goa flyover accident Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: पर्वरीत उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला! "सुरक्षेची खात्री देणार की बळी जाण्याची वाट बघणार"? अमरनाथ पणजीकरांचा सरकारला सवाल

Porvorim flyover slab collapse: पर्वरी उड्डाणपुलाचा एक स्लॅब घालतानाच कोसळला असल्याने आता हा उड्डाणपूल वेळेत बांधून तयार होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Akshata Chhatre

पर्वरी: गिरी पर्वरी येथील उड्डाणपुलाचं काम जलदगतीने सुरु असल्याने वेळेआधीच नागरिकांना उड्डाणपूल बनवून मिळेल अशी संभावना व्यक्त केली जात होती, मात्र अशात रविवारी (दि.१८) रोजी पर्वरी उड्डाणपुलाचा एक स्लॅब घालतानाच कोसळला असल्याने आता हा उड्डाणपूल वेळेत बांधून तयार होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुदैवाने दुर्घटना टळली

पर्वरी येथील उड्डाणपुलाचे काम सुरु आहे आणि दरम्यान शुक्रवारी दुपारी १:३०च्या सुमारास उड्डाणपुलाचा स्लॅब घालताना पडल्याने पर्वरी परिसरात गोंधळ झाला. या घटनेत एक माणूस जखमी असल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

केबलमधील काही त्रुटींमुळे स्लॅब खाली आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. काही दिवसांपूर्वीच प्रकल्पाचे विविध टप्पे जवळपास पूर्णत्वास येत असून राहिलेलं काम देखील नियोजित वेळेत पूर्ण गोव्यातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एकावर बांधला जाणारा हा पूल दररोज हजारो वाहनांची वाहतूक करतो. हा पूल एक महत्त्वाचा दुवा आहे आणि त्याच्या बांधकाम गुणवत्तेत कोणतीही तडजोड करणे म्हणजे जनतेच्या सुरक्षिततेला उघड आव्हान आहे.होणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम खात्याने व्यक्त केला होता मात्र आता घडलेल्या या घटनेमुळे उड्डाणपुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

या दुर्घटनेनंतर गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे (GPCC) मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी विचारले आहे की, "या अपयशासाठी कोणाला जबाबदार धरले जाईल? स्लॅब कोसळल्यानंतर सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे का? हा पूल पूर्ण झाल्यावर तो सार्वजनिक वापरासाठी सुरक्षित असेल का? सरकार प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री देईल की आणखी बळी जाण्याची वाट पाहील?"

पणजीकर पुढे म्हणाले, "ही घटना केवळ लाजिरवाणी नाही, तर एक मोठी धोक्याची घंटा आहे. बांधकाम करतानाच जर स्लॅब कोसळत असेल, तर पूर्ण झालेल्या पुलावर जनता कसा विश्वास ठेवणार? हा पूल जनतेच्या पैशातून उभा राहत आहे, पण प्रत्यक्षात जनतेचा जीव धोक्यात येत आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT