goa tourism minister rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: "पर्वरी उड्डाणपुलाचे काम वाहतूक न थांबवता पूर्ण करा", मंत्री खंवटे यांचे कंत्राटदारांना निर्देश

Porvorim Flyover Work: उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी काही ठराविक दिवशी रस्ता बंद करूनच काम करण्याची आवश्यकता आहे

Akshata Chhatre

पर्वरी: पर्वरी येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने केलेल्या मागणीसंदर्भात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी काही ठराविक दिवशी रस्ता बंद करूनच काम करण्याची आवश्यकता आहे, असे कंत्राटदाराचे मत असले तरी, हे काम करताना वाहतुकीला कोणताही अडथळा नको, अशी स्पष्ट सूचना आपण केली असल्याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

मंगळवारी (दि.२२) पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा आणि महत्त्वपूर्ण सूचना

मंत्री खंवटे यांनी सांगितले की, त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्याशी चर्चा केली आहे. उड्डाणपुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, असे निर्देश ज्ञात आले आहेत. यासोबतच, त्यांनी कंत्राटदाराला अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या:

१. खराब रस्त्यांचे डांबरीकरण (Hotmixing): कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांवर तातडीने हॉटमिक्सिंग डांबरीकरण करावे.

२. पार्किंग व्यवस्था: वाहनांसाठी पर्यायी पार्किंग जागा उपलब्ध करावी.

३. धुळीवर नियंत्रण: जेथे धुरळा (Dust) उडतो, तेथे पाण्याचा किंवा डांबराचा वापर करून धुळीवर नियंत्रण मिळवावे.

४. नवे रस्ते तयार करावेत: कामामुळे त्रास टाळण्यासाठी आवश्यक असल्यास नवे पर्यायी रस्ते (Alternative Roads) तयार करावेत.

गोव्याची बदनामी टाळण्यासाठी खबरदारी

मंत्री खंवटे यांनी पर्यटन हंगामाचा उल्लेख करत कामाच्या नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, योग्य नियोजन करून काम केले तर लोकांना त्रास होणार नाही. सध्या गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत आणि जर त्यांना या कामामुळे त्रास झाला, तर गोव्याची बदनामी होऊ शकते. त्यामुळे, लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! 'मत्स्यगंधा एक्सप्रेस'मधून 50 लाखांचं सोनं, 34 हजारांची रोकड जप्त! हरियाणातील 4 जण अटकेत

IND vs SA 1 Test: टीम इंडियाला डबल झटका! लाजिरवाण्या पराभवानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये घसरण; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

Pooja Naik: 'माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पालेकरांकडे फक्त मदतीसाठी गेले', पूजा नाईकचे राजकीय संबंधांवर स्पष्टीकरण

Crime News: क्रूरता! लग्नाला काही तास उरले असताना प्रियकर बनला 'मारेकरी', पैशांच्या वादातून प्रेयसीला संपवलं

Budget Smartphones: 5G, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठी जबरदस्त... 'हे' स्मार्टफोन मिळतायत फक्त 15 हजारांत

SCROLL FOR NEXT