Porvorim Flyover Meeting: परवरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचो घेतलो नियाळ - रोहन खंवटे

Porvorim: उड्डाणपुलाच्‍या कामामुळे पर्वरीत होणारी वाहतूक कोंडी रोखण्‍यासाठी पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी कंबर कसली आहे.

पणजी : उड्डाणपुलाच्‍या कामामुळे पर्वरीत होणारी वाहतूक कोंडी रोखण्‍यासाठी पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी कंबर कसली आहे. याबाबत त्‍यांनी मंगळवारी उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्‍यासह उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

म्‍हापसा ते पणजी मार्गावरून सातत्‍याने प्रवास करणारे नागरिक आणि पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, यादृष्‍टीने आवश्‍‍यक ती पावले उचलण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी बैठकीनंतर मंत्रालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत सांगितले.

पर्वरीतील उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. परंतु, या परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍‍यक ती पावले न उचलल्‍याने त्‍याचा फटका वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी तसेच पर्यटकांना बसत आहे. राज्‍यात लवकरच पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. अशा स्‍थितीत देश-विदेशातून येणारे पर्यटक आणि स्‍थानिकांना या कामाचा त्रास होऊ नये, यासाठी कोणकोणत्‍या उपाययोजना राबवता येतील, याबाबत मंगळवारच्‍या बैठकीत चर्चा करण्‍यात आली. मी आणि उपसभापती जोशुआ डिसोझा बुधवारी सकाळी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत. त्‍यानंतर पुढील आठवड्यात हाती घेण्‍यात येणाऱ्या कामांसंदर्भात बैठक घेण्‍यात येणार आहे. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत यांनाही बोलावण्‍यात येणार आहे, असे त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, राज्‍यातील सर्वच भागांतील रस्‍त्‍यांच्‍या हॉटमिक्स डांबरीकरणाची कामे तत्‍काळ हाती घेण्‍याचे निर्देश मंत्री कामत यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. त्‍यामुळे पर्वरीतील रस्‍त्‍यांची कामेही लवकर सुरू होतील. परंतु, तीन बिल्‍डिंग ते अटल सेतूपर्यंतचे रस्‍ते सुरक्षित वाहतुकीसाठी कसे उपलब्‍ध करून देण्‍यात येतील, त्‍यावर लवकरच निर्णय घेण्‍यात येईल, असेही त्‍यांनी नमूद केले. दोन्‍ही रस्‍त्‍यांच्‍या हॉटमिक्‍स डांबरीकरणाचा प्रस्‍ताव

पर्वरीत ज्‍या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंना असलेले रस्‍ते मातीचे आहेत. त्‍यांची स्‍थितीही ठीक नाही. शिवाय या रस्‍त्‍यांवरील मातीमुळे धूळ प्रदूषणही होत आहे. त्‍यामुळे या मार्गावरील तीन बिल्‍डिंग ते अटल सेतूपर्यंतच्‍या दोन्‍ही मार्गांचे हॉटमिक्‍स डांबरीकरणाचा प्रस्‍ताव आहे. त्‍यावर पुढील आठवड्यात साबांखा मंत्री दिगंबर कामत यांच्‍या उपस्‍थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्‍यात येईल, असे मंत्री खंवटे म्‍हणाले.

इंधन, धान्‍य, औषधे अशाप्रकारच्‍या अत्‍यावश्‍‍यक वस्‍तूंची आयात-निर्यात करणाऱ्या वाहनांची वाहतूक सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत करू नये. अशी वाहने दिवसा रस्‍त्‍यात अडकली, की त्‍यामुळे वाहतूक कोंडी होऊन त्‍याचा फटका इतर वाहनचालकांना बसतो. याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com