Porvorim Flyover Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: 88 पैकी 40 खांबांचे काम पूर्ण! पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर

Porvorim Flyover Construction: पर्वरीत उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच महिन्यात या उड्डाणपुलावर ‘मॅजेस्टिक’ हॉटेल येथून ‘बॉक्स गर्डर सेगमेंट’ उभारणीस प्रारंभ होणार आहे.

Sameer Panditrao

Porvorim Flyover Construction update

पर्वरी: उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच महिन्यात या उड्डाणपुलावर ‘मॅजेस्टिक’ हॉटेल येथून ‘बॉक्स गर्डर सेगमेंट’ उभारणीस प्रारंभ होणार आहे. एकूण ८८ खांब उड्डाणपुलासाठी उभारण्यात येणार आहेत. त्‍यांपैकी आत्तापर्यंत ४० खांबांचे काम पूर्ण झाले तर १२ खांबांची पायाभरणी सुरू आहे. विशेष म्‍हणजे अवघ्‍या चार महिन्‍यांत ही उपलब्‍ध साधली आहे.

गिरी-पर्वरी येथेही सेगमेंट तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्‍यासाठी लागणारे सिमेंटचे मिश्रण व इतर प्रक्रिया गिरी परिसरातच पूर्ण केली जात आहे. १५५ बॉक्स गर्डर सेगमेंट तयार आहेत. आणखी काही सेगमेंट तयार करण्यात येत आहेत. या कामासाठी एकूण १४३१ सेगमेंट लागणार आहेत.

सदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्‍यानंतर पर्वरीतील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे. या प्रकल्पाचे काम वेळेच्या आधी पूर्ण करण्याचा निर्धार संबंधित यंत्रणांनी केला असून त्‍यादृष्‍टीने प्रयत्‍न सुरू आहेत. या वेगवान कामगिरीसाठी संबंधित टीमवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. प्रकल्पाचा आराखडा आणि महत्त्व

सदर उड्डाणपूल हा पर्वरी आणि गिरी परिसरातील वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरणार आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संस्‍था आणि त्‍यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन या प्रकल्पाला सुरवात करण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे पर्वरी ते गिरीदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

मार्चपर्यंत सर्व खांब उभारणार

सप्टेंबर २०२४ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ झाला असून अवघ्या चार महिन्यांत ४० खांब उभारण्यात आले आहेत. पायाभरणीपासून सेगमेंट तयार करण्यापर्यंतचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०२५ पर्यंत सर्व खांब उभारण्‍याचे काम पूर्ण होणार असल्याचे प्रकल्पाचे उपाध्यक्ष राजदीप भट्टाचार्य यांनी सांगितले.

काय होणार फायदा?

वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

वेळ आणि इंधनाची बचत होणार

उड्डाणपुलाच्या निर्मितीतील टप्पे

एकूण ८८ खांब उभारणार

सध्या ४० खांबांचे काम पूर्ण

अन्‍य १२ खांबांची पायाभरणी

मार्च २०२५ पर्यंत सर्व खांब उभारण्याचे ध्‍येय

१५५ बॉक्स गर्डर सेगमेंट तयार

सेगमेंट उभारणीच्‍या कामाला सुरवात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT