Porvorim Flyover
Porvorim FlyoverDainik Gomantak

Porvorim Flyover: 26 खांबांचे काम पूर्ण! पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर, प्रकल्प वेळेत संपणार

Porvorim Flyover: गिरी-पर्वरी उड्डाणपुलाचे काम योग्य दिशेने आणि गतीने सुरू आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या एप्रिल २०२६ या वेळेत प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत आहे.
Published on

यशवंत सावंत

पणजी: गिरी-पर्वरी उड्डाणपुलाचे काम योग्य दिशेने आणि गतीने सुरू आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या एप्रिल २०२६ या वेळेत प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत आहे. या उड्डाणपुलासाठी एकूण ८८ खांब उभारले जाणार असून त्यापैकी २६ खांब (२९.५५ टक्के) पूर्ण झाले असून ३५ (३९.७७ टक्के) खांबांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे हे काम सुरू असल्याने ते वेगाने होणे अपेक्षित आहे. राज्य सरकारदेखील काम वेगाने होईल याची दक्षता घेत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. बांधकाम खात्याचे राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता ज्यूड कार्व्हाल्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार ८८ पैकी १६ पियर कॅप्स पूर्ण झाले आहेत. तसेच १४३१ पैकी १०० बॉक्स गिरडर सेगमेंट्स पूर्ण झाले आहेत.

Porvorim Flyover
Goa Crime: काँग्रेस नेते चोडणकर यांच्‍या कारची नासधूस; 'ट्विट'वरुन हल्ला झाला असल्याची शक्यता, बजरंग दलाने फेटाळले आरोप

उड्डाणपुलाचे बांधकाम चालू असल्याने परिसरातील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना रोज करावा लागत आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गैरसोय कमी करण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना करत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस मेहनत घेत आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवास अधिक सोयीचा होईल.

Porvorim Flyover
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

२६ खांबांचे काम पूर्ण

खांब पायाभरणी : ३९.७७% पूर्ण (८८ पैकी ३५ पूर्ण)

खांब पूर्ण : २९.५५% पूर्ण (८८ पैकी २६ पूर्ण)

पियर कॅप्स: १८.१८% पूर्ण (८८ पैकी १६ पूर्ण)

बॉक्स गिरडर सेगमेंट्स: ६.९९% पूर्ण (१४३१ पैकी १०० पूर्ण)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com