Porvorim Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Porvorim: दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा तास? पर्वरीत वाहतुकीचा बोजवारा; अरुंद रस्ते, पोलिस कमतरतेमुळे कोंडी

Porvorim Flyover: . काही दिवसांपूर्वी गिरी जंक्शनवर उड्डाण पुलाचा सेगमेंट खाली पडला होता. त्यामुळे या बांधकामाच्या बाजूने सुरक्षिततेच्या दृष्टीने जागा अडवण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे

Sameer Panditrao

पणजी: पर्वरीत उड्डाण पुलाच्या कामामुळे तेथील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. येथील अरुंद रस्त्यांवर वाहन हाकताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यातच पावसामुळे रस्त्यांची धूप होऊन जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक रेंगाळत असल्याने सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

या रस्त्यांवर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले असले तरी ते कमी पडत आहेत. सतत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. चालकांना गिरी व सांगोल्डा या जंक्शनवरून पणजीत पोचण्यास तासनतास रांगेत तिष्ठत राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

सोमवारी आठवड्याचा पहिल्याच दिवस असल्याने पणजीत येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. काही दिवसांपूर्वी गिरी जंक्शनवर उड्डाण पुलाचा सेगमेंट खाली पडला होता. त्यामुळे या बांधकामाच्या बाजूने सुरक्षिततेच्या दृष्टीने जागा अडवण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे.

प्रत्येक वाहन चालकाला पुढे जाण्याची घाई असल्याने एका रांगेने न जाता रस्त्यावर तीन रांगा लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या वाहतूक पोलिसांची बरीच तारांबळ उडत आहेत. त्यातच रस्त्यावरील खड्ड्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने खड्डे वाचवण्यासाठी वाहन चालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. दुचाकीस्वारही चारचाकींच्या बाजूने वाहने घुसवत असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होतो.

मोंत गिरी उड्डाण पूल ते सांगोल्डा जंक्शनपर्यंत दीड किलोमीटरचे अंतर पार करण्यास दुचाकीस्वारांना २० ते २५ मिनिटे लागत आहेत. सकाळी, दुपारी व संध्याकाळी या मार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. इतर वेळी या रस्त्यावर वाहतूक सुरळीत असते. पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक वाहतूक पोलिस तैनात केले जातील, अशी माहिती वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली.

वाहतूक पोलिस अधिकारी रजेवर!

वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक तसेच उत्तर गोवा उपअधीक्षक हे दोघेही रजेवर आहेत. अधीक्षकपदाचा तात्पुरता ताबा किनारपट्टी अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्याकडे देण्यात आला असला तरी दक्षिण गोवा पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्यावर संपूर्ण गोव्यातील वाहतुकीवर लक्ष वेळ आली आहे. पर्वरी उड्डाण पुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येतील, अशी माहिती प्रभुदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Viral Video: बघता-बघता फिटनेस सेंटर बनले 'आखाडा'; जिममध्ये तरुणांची तुंबळ हाणामारी, रॉडने हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Hartalika Tritiya 2025: अखंड सौभाग्य आणि सुयोग्य वरासाठी 'हरितालिका व्रत'; वेळ आणि पूजेची पद्धत काय? सविस्तर जाणून घ्या

Goa Live News: सत्तरीत थरार! साडेबारा फुटांचा महाकाय किंग कोब्रा सर्पमित्राने पकडला

SCROLL FOR NEXT