Porvorim Fire News: पर्वरीत ऑफिसच्या गोदामाला भीषण आग! 2.5 कोटींची हानी; OFC केबलसह दोन मालवाहू गाड्या जळाल्या, Video

Porvorim Fire Incident: उन्हामुळे वायर्स पेट घेतल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आगीने शेजारील वाहने गाठली.

पर्वरी: येथील कदंब आगार परिसराजवळ असलेल्या ईथरनेट एक्सप्रेसच्या कार्यालयाच्या गोदामात सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत फायबर ऑप्टिक केबलींसह दोन मालवाहू गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून एक वाहन अर्धवट जळून खाक झाले, तर दुसऱ्या वाहनाच्या मागील भागाला आगीचा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे २.५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे.

आगीची सुरुवात खुले मैदानात पडून असलेल्या उघड्या ऑप्टिक वायर्समधून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हामुळे वायर्स पेट घेतल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आगीने शेजारील वाहने गाठली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत कोणाचा हेतुपुरस्सर हात असल्याचा संशय ईथरनेट व्यवस्थापनाने व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com