Porvorim Elevated Road Dainik Gomantak
गोवा

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? तज्ज्ञांच्या विविध पर्यायांवर चर्चा, अंतिम निर्णय

Porvorim Elevated Road Traffic Management: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक गैरव्यवस्थापनावर तोडगा काढण्यासाठी सोमवारपासून आवश्यक उपाययोजना लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक गैरव्यवस्थापनावर तोडगा काढण्यासाठी सोमवारपासून आवश्यक उपाययोजना लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आज रात्री सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

उन्नत मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या विविध पर्यायांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या रविवारी होणाऱ्या बैठकीत या उपाययोजनांवर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक या बैठकीला उपस्थित असतील.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता संदीप चोडणेकर, खडगपूर आयआयटीचे डॉ. लक्ष्मण बिश्त, शिवांशू आदी अधिकारी व मंत्री कामत यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. उन्नत मार्गावरील सध्याची वाहतूक व्यवस्था, वाहनांच्या प्रवेश-निर्गमनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि स्थानिक वाहतुकीवर होणारा परिणाम यावर चर्चा करण्यात आली.

‘आयआयएम’ कडून पाहणी

नागपूर आयआयएमच्या तज्ज्ञ पथकाने आज पर्वरी उन्नत मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक रहिवाशांना उन्नत मार्गाचा सहज वापर करता यावा, तसेच मुख्य महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी कोणत्या ठिकाणांहून वाहनांना प्रवेश देता येईल, याची पाहणी करण्यात आली. तज्ज्ञांच्या अभ्यासानंतर आणि रविवारी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा भीषण पुराचा तडाखा! बूढी गंडकी नदीने घरे, पूल आणि बेस कॅम्प वाहून नेले, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT