Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

Kanpur Police Assault Case: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. इथे एका ऑन-ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याला काही किन्नरांनी अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार घडला.
Kanpur Police Assault Case
Police AssaultDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Kanpur Police Assault Case: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. इथे एका ऑन-ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याला काही किन्नरांनी अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर पोलीस वर्तुळात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर कानपूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी आणि तृतीयपंथीयांमधील वाद स्पष्टपणे दिसतो. भांडण विकोपाला गेल्यानंतर तृतीयपंथीयांनी पोलीस कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिमध्ये काही तृतीयपंथी आधी पोलिसाशी जोरदार हुज्जत घालतात आणि नंतर त्याला बेदम मारहाण करतात. एवढेच नाही तर एका तृतीयपंथीयाने पोलिसाच्या (Police) छातीवर लाथ मारली.

Kanpur Police Assault Case
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा वाद नक्की कोणत्या कारणावरुन सुरु झाला आणि मारहाणीपर्यंत परिस्थिती कशी पोहोचली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपासाअंतीच याचे कारण समोर येईल.

Kanpur Police Assault Case
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी पीडित कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाबाबत माहिती देताना घाटमपूरचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) कृष्णकांत यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील व्हिडिओची तात्काळ दखल घेण्यात आली. संबंधित पोलिसाच्या अर्जावरुन गुन्हा नोंदवण्यात आला असून कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. पोलीस सध्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.