Porvorim Dainik Gomantak
गोवा

Porvorim: पर्वरीत देवस्थान स्थलांतराला विरोध! आस्थेबाबत राजकारण न करण्याचे आवाहन

Porvorim News: शंकर फडते यांनी सांगितले की, आम्ही या संदर्भात खासदार श्रीपाद नाईक तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना भेटलो असता त्यांनी यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Khapreshwar Devasthan Relocation

पणजी: पर्वरीत राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल केली जात आहे. आम्हालाही हा रस्ता हवा आहे, परंतु आमची आस्था असलेल्या खाप्रेश्‍वर देवस्थान आणि वडाला हानी पोहोचवून आम्हाला हा विकास नको, असे स्थानिक शंकर फडते यांनी सांगितले.

आझाद मैदान येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी खाप्रेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, कल्पना मोरजकर, कीर्ती कुडणेकर, सुहास मोरजकर, वासुदेव च्यारी, आवेर्तिन मिरांडा, दीपेश नाईक आदी उपस्थित होते.

शंकर फडते यांनी सांगितले की, आम्ही या संदर्भात खासदार श्रीपाद नाईक तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना भेटलो असता त्यांनी यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींना यात राजकीय तोटा दिसत आहेत, आम्ही राजकारण करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमचा विरोध हा केवळ खाप्रेश्‍वर मंदिर तसेच वडाला राखण्यासाठी असून यासंबंधी आम्हाला कोणत्याच प्रकारचे राजकारण नकोय, असे त्यांनी सांगितले.

आस्था अबाधित राखावी

या रस्त्याच्या बाजूला ज्यांचे उद्योग, दुकाने आहेत, त्यांनी न्यायालयात जाऊन आपल्या मालमत्ता वाचविल्या आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी वडाचे झाड आणि देवस्थान हटवण्यात येणार आहे, परंतु ते न हटविता काम करणे शक्य आहे. एखादी इमारत मोडल्यास ती पुन्हा बांधता येते, परंतु वडाचे झाडाला शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे या देवस्थान व वडाप्रती असलेली भाविकांची आस्था अबाधित राखावी, अशी आमची मागणी असल्याचे फडते यांनी सांगितले.

स्थलांतरित केलेले किती वड जगले?

श्री खाप्रेश्‍वर देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान आहे. तसेच येथील वडाला देखील नागरिक पूजतात. आम्ही देवस्थान किंवा वड स्थलांतरित करू देणार नाही. आजपर्यंत जेवढे वड स्थलांतरित केले, त्यातील किती वड जगले, असा प्रश्‍न कल्पना मोरजकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT