Porvorim Accident between two car near RG hospital Dainik Gomantak
गोवा

Porvorim Car Accident: पर्वरीत दोन कारमध्ये भीषण अपघात; कारचालकासह दोघेजण जखमी

रात्री पर्वरीतही भीषण अपघात घडला आहे

दैनिक गोमन्तक

Severe Car Accident in Porvorim: 2022 च्या तुलनेत 2023 सुरू झाल्यापासून गोव्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काल रात्री पर्वरीतही भीषण अपघात घडला आहे. या वाढत्या अपघातांमुळे आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंमुळे सगळ्यांच्याच चिंतेमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे.

माहितीनुसार, पर्वरीतील आर. जी. हॉस्पिटलसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकींमध्ये जोरदार धडक बसली. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये चालकासह अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

संबंधित अपघातात नेमकी चूक कुणाची हे अद्याप कळू शकले नाही. जखमी झालेल्यांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्यभर विविध 13 ठिकाणी ट्रॅफिक कॅमेरे बसवण्यात येणार असून इथून पुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर हे कॅमेरे लक्ष ठेऊन असणार आहेत. तसेच नियम मोडल्याबद्दल थेट वाहनचालकांच्या मोबईलवरच चलन पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मांडवी पुलावरही असाच अपघात घडला होता. पुलावर टेम्पो आणि दोन दुचाकी यांच्या अपघात झाला. यामध्ये दोन्ही दुचाकी चालकांना गंभीर दुखापत झाली होती. अपघात झाल्यानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT