CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

पोर्तुगीज दडपशाहीचा तर कदंब गोव्यासाठी सुवर्णकाळ होता; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पर्वरी येथील लेखा संचालनालयाच्या नवीन कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले

Pramod Yadav

Portuguese: गोव्यातील पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा पुसून टाकल्या जाव्यात अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर गोव्यासाठी पोर्तुगीज राजवट दडपशाहीचा तर कदंब घराण्याचा सुवर्णकाळ होता, असे वक्तव्य केले आहे.

पोर्तुगीजांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण केल्या पण, त्यांनी बहुतांश स्वार्थी, वसाहतवादी हितसंबंधांना चालना दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

पर्वरी येथील लेखा संचालनालयाच्या नवीन कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यांनी ही प्रतिक्रिया दिली. लेखा संचालनालयाची नवीन वास्तू गोमन्तकीयांनी पोर्तुगीज पूर्व राज्यकर्त्यांच्या वैभवाची आठवण करून देते.

"पोर्तुगीजांची 450 वर्षांची राजवट हा दडपशाहीचा काळ होता. परंतु कौटिल्य आणि चाणक्य यासारख्या प्राचीन विचारवंतांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली," असे सावंत म्हणाले.

पोर्तुगीज गोव्यातील नैसर्गिक संपत्ती लुटण्यासाठी राज्यात आले, असा मुख्यमंत्र्यांनी वारंवार उल्लेख केला आहे. "पोर्तुगीजांनी कधीच संपूर्ण गोव्यावर राज्य केले नाही. त्यांनी फक्त सासष्टी, बार्देश आणि तिसवाडी या तालुक्यांवर राज्य केले आणि निघण्यापूर्वी त्यांनी सत्तरी आणि डिचोली ताब्यात घेतले," असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT