Old Borim Bridge, Portuguese Era Bridge Goa Dainik Gomantak
गोवा

Old Borim Bridge: 200 वर्षांपूर्वीचा पूल, पोर्तुगीजांनी बॉम्बने उडवला होता भाग; जुन्या आठवणींना देतोय उजाळा

Portuguese Era Borim Bridge: सुमारे २०० वर्षांपूर्वी पोर्तुगीज अमदानीत बोरी येथे झुआरी नदीवर बांधलेल्या पुलाचे भग्न अवशेष आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत.

Sameer Panditrao

बोरी: सुमारे २०० वर्षांपूर्वी पोर्तुगीज अमदानीत बोरी येथे झुआरी नदीवर बांधलेल्या पुलाचे भग्न अवशेष आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. पोर्तुगीज अमदानीतील हा पहिला पूल आजही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.

पोर्तुगीजांनी जातेवेळी बॉम्ब घालून या पुलाचा काही भाग उडवून दिला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने या पुलाचा निकामी बनलेल्या भाग हटवून त्या ठिकाणी तंरगता पूल बांधला. या पुलावरून बरीच वर्षे वाहतूक चालू राहिली होती.

दरम्यान, झुआरी नदीच्या पात्रातून जाणाऱ्या बार्जींनी पुलाच्या खांबावर धडक देऊन हा पूल खिळखिळी केला. पुढे हा पूल वाहतुकीस निकामी झाल्याने तो हटवून जवळ नवा पूल बांधला.मात्र जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्याच्या दगडी कमानी अजूनही मजबूत उभ्या आहेत. सध्या त्यावर झुडपे वाढलेली आहेत.

पोर्तुगीज अमदानीत बांधलेला हा ऐतिहासिक पूल त्या काळातील स्थापत्यकलेचे प्रतीक मानला जातो. पोर्तुगीजांनी आपल्या प्रशासनकाळात या भागात महत्त्वपूर्ण पूल उभारले होते. त्यातीलच हा झुआरीवरील पूल एक आहे.

योग्य देखभाल केल्यास या ऐतिहासिक वास्तूचे जतन करता येऊ शकते. स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींनी या जागेचे जतन करण्याची मागणी केली आहे. हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नव्हता, तर तो त्या काळातील राजकारण, व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांचा साक्षीदार होता, याची आठवण आजही त्याचे भग्न अवशेष करून देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT