Zuari River: झुआरी पात्रातील भग्न पूल ठरू शकतो 'जीवघेणा', बोटींना अपघात होण्याची शक्यता; त्वरित उपाययोजनेची गरज

Borim Zuari River: कालांतराने या लहान पुलाची देखभाल न झाल्याने तो मोडून पडला. मात्र, पुलाचे खांबाचे चौथरे नदीच्या पात्रात तसेच शिल्लक आहेत.
Borim Zuari River
Borim Zuari RiverDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी : येथील झुआरी नदीच्या पात्रात असलेल्या भग्न चौथऱ्यांमुळे बार्जेस, होड्या आणि बोटींच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी गंभीर अपघात होण्याची भीती स्थानिक मच्छीमार आणि जलवाहतुकीशी संबंधित व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

बोरी परिसरात झुआरी नदीवर एक मुख्य पूल आहे. त्याच्या बाजूला झुआरी ॲग्रो केमिकल (वास्को) या खत कारखान्याला ‘ओपा’ जलप्रकल्पातून पाणी पोहोचवण्यासाठी एक पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यासाठी एक लहान पूल उभारण्यात आला होता. मात्र, सध्या या कारखान्याला साळावली धरणातून पाणी पुरवठा होत असल्याने बोरीतील पाईपलाईन आणि पूल निष्क्रिय झाला आहे.

Borim Zuari River
Borim: बोरी ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी! वाढीव घरपट्टी होणार कमी, ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव

कालांतराने या लहान पुलाची देखभाल न झाल्याने तो मोडून पडला. मात्र, पुलाचे खांबाचे चौथरे नदीच्या पात्रात तसेच शिल्लक आहेत. हे चौथरे ओहोटीच्या वेळी स्पष्ट दिसतात, पण भरतीच्या वेळी पाण्याखाली जातात. त्यामुळे रात्रीच्या अंधारात बार्जेस किंवा बोटी चालवणाऱ्यांना हे अडथळे दिसत नाहीत, आणि मोठ्या अपघातांचा धोका संभवतो.

Borim Zuari River
Borim Bridge: बोरी पुलाबाबत सुनावणी एप्रिलमध्ये! शेतकऱ्यांना जमीन संपादनाची भीती, कृतिसाठी घेणार बैठक

स्थानिक नागरिक आणि मच्छीमार संघटनांनी प्रशासनाला वारंवार याकडे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. या भग्न चौथऱ्यांचे तातडीने हटवले जावे, अशी जोरदार मागणी आता पुन्हा एकदा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com