POP Ganesh Idols Dainik Gomantak
गोवा

परराज्यातून येणाऱ्या PoP गणेशमूर्त्यांवर ठेवला जाणार वॉच, प्रवीण आर्लेकरांनी सांगितले कशी घेणार काळजी

गणेशोत्सव काळात बंदी असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती परराज्यातून गोव्यात येत असतात.

Pramod Yadav

POP Ganesh Idols: पावसाळा आला की सर्वांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे, जून महिन्यांचे काही दिवस शिल्लक असून, गणेशोत्सवासाठी आता केवळ दोन महिने उरले आहेत. गोव्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी बाप्पाची स्थापना केली जाते.

दरम्यान, याकाळात बंदी असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती परराज्यातून गोव्यात येत असतात. याप्रकरणी प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी विशेष घेणार असल्याचे म्हटले आहे.

पेडणे मार्गे परराज्यातून गोव्यात येणाऱ्या गणेश मूर्त्यांवर तीन तपासणी नाके यांच्या मार्फेत वॉच ठेवला जाईल असे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले. न्हयबाग, पत्रादेवी आणि आरोंदा याठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार असल्याची माहिती पार्लेकर यांनी दिली असून, येथे कडक तपासणी केली जाईल अशी खात्री त्यांनी दिली.

या तीन मार्गावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर पीओपी पासून बनवलेल्या गणेश मूर्ती दाखल होतात त्यामुळे अधिक काळजी घेतली जाईल असेही आर्लेकर म्हणाले.

मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती बनवणे आणि खरेदीला प्राधान्य देण्याबाबत देखील आर्लेकर यांनी मत मांडले.

पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक जड आणि महागड्या असतात, त्यामुळे पीओपी पासून बनवलेल्या मूर्तींना अधिक मागणी असते. मात्र, पीओपी मूर्तींचे पाण्यात विसर्जन केल्याने त्याचे धोके अधिक आहेत.

याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाणे गरजेचे आहे. मातीपासून मूर्ती बनविण्यासाठी सरकार कलाकारांना अनुदान देत असून, ते यावर्षी दुप्पट केले जाणार आहे. तसेच, मूर्ती बनविण्यासाठी सरकार त्यांना मशीन देखील देणार असल्याचे आर्लेकर म्हणाले.

कलाकारांनी पीओपी वगळून मातीच्या मूर्तीच्या विक्रीसाठी ठेवाव्यात असे आवाहन देखील आर्लेकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT